बदलापूरमध्ये (Badlapur Case ) घडलेल्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) हा पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला आहे. पोलिसांनी स्वरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे.
अक्षयच्या 'एन्काऊंटर'नंतर आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (sanjay raut)यांनी अक्षयच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे. सरकारच्या भूमिकेवर राऊतांनी ताशेरे ओढले आहेत.
अक्षय शिंदे याने पोलिसांवर हल्ला केला? असा आश्चर्यकारक प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे. अक्षय शिंदे याला पोलिस घेऊन जात होते तेव्हा त्याचे हात बांधलेले व तोंडावर बुरखा होता. त्यामुळे नक्की काय घडले? असा प्रश्न राऊतांनी शिंदे- फडणवीस-पवार सरकारला विचारला आहे. "कुणाला वाचविण्यासाठी शिंदे फडणवीस हा बनाव करत आहेत? महाराष्ट्राला सत्य कळायलाच हवे," असे राऊतांनी एक्सवर म्हटलं आहे.
बदलापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेने स्वतःवर गोळी झाडल्याची माहिती आधी समोर आली होती. त्यानंतर त्याचा एन्काऊंटर झाल्याचे समजले. हे सर्व संशयास्पद असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. पोलीस आणि राज्य सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे.
सोमवारी (ता. २३) सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.अक्षयचा एन्काऊंटर झाला की केला? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे.अक्षय हा साधूसंत नव्हता त्याने आधी पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं आहे.
अक्षय शिंदेला अटक केल्यानंतर त्याला आमच्या ताब्यात द्या किंवा फाशी द्या अशी मागणी बदलापुरच्या नागरिकांनी केली होती. यासाठी त्यांनी रेलरोको आणि रास्तारोको आंदोलन देखील केलं होतं. अक्षयच्या एन्काउंटरनंतर बदलापुरमध्ये महिलांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. तर बदलापूर रेल्वे स्थानकावर बॅनर झळकावत जल्लोष करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.