Jitendra Awhad presenting evidence of major voter list errors, alleging 42 children under one voter’s name Sarkarnama
महाराष्ट्र

Election Commissions Vote Theft : 'एकाच बापाची 42 मुलं म्हणजे त्याच्या बायकोला...', निवडणूक आयोगाची आव्हाडांकडून चिरफाड

Jitendra Awhad: एकाच घरात 80 मतदार राहत असल्याचे राहुल गांधी यांनी उघडकीस आणले होते आता 42 मुलांचा एकच बाप असल्याची नोंद निवडणूक आयोगाच्या मतदारयादीत असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी समोर आणले आहे.

Roshan More

Vote Theft News: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मत चोरी होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मतदारयाद्यांमधील घोळ त्यांनी पुराव्यासह मांडले. एकाच घरात 80 जण राहत असल्याचे मतदारयाद्यीमध्ये नोंद असल्याचे देखील त्यांनी पुढे आणले. राहुल गाधींच्या या गंभीर आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील निवडणूक आयोगाच्या मतदारयाद्यांची चिरफाड केली आहे.

आव्हाड यांनी मतदारयादीचा फोटो ट्विट केला आहे. त्यामध्ये 42 मतदारांच्या वडिलांचे नाव राम कमल दास आहे. आव्हाड म्हणाले की, 'एकाच बापाची 42 पोरं,वय सगळ्यांचे 29 ते 67 च्या आसपास आहेत. अनेक पोरं एकाच वर्षी जन्माला काढून राम कमल दासने विश्वविक्रम केला आहे. निवडणूक आयोग खूपच पराक्रमी निघाला.'

'एकाच घरात 80 मतदार राहतात. राम कमल दास त्याला ८० पोरं? त्याचं मी कॅल्युलेशन केलं म्हणजे त्याच्या बायकोला एका वर्षात तीन पोरं झाली आहेत. आमच्या भगिनीला एक वर्षात तीन बाळं झाली.', अशी खोचक टिपण्णी देखील आव्हाड यांनी केली.

पुढे बोलताना ते म्हणाले, 'निवडणूक आयोगाकडून हे अपेक्षित नाही. या देशाचे संविधान बनवताना बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणूक आयोगाला स्वायत्त भूमिका दिली आहे. स्वायत्त भूमिका यासाठी दिली आहे की, पाच वर्षानंतर येणारी निवडणूक ही लोकशाहीला ताकद देत असते. ताकदवान बनवत असते.'

'तुमच्या मनातील विचार मतांत रुपांतर होत असतात त्यांचं अस्तित्व दिसत असतं. ते अस्तित्व नष्ट करण्याचा काम होत असेल तर तुम्ही संविधान नष्ट, उद्धवस्त करताय. त्यामुळे तो घोळ आहे की घोटाळ आहे, चोरी आहे याच्याशी मला घेणेदेणं नाही. एकाच घरात ८० लोकं?', असा संताप देखील आव्हाड यांन व्यक्त केला.

'इंडिया'चा निवडणूक आयोगावर मोर्चा

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाकडून, भाजपकडून मत चोरी होत असल्याचा आरोप केला आहे. कर्नाटकमधील महादेवपुरा मतदारसंघातील एक लाखापेक्षा अधिक मतदार बोगस असल्याचे राहुल यांनी पुराव्यानिशी मांडले आहे. त्यामुळे आज इंडिया आघाडीकडून निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढत कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT