
Anand Sharma’s Decision : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेचे खासदार आनंद शर्मा यांनी पक्षातील महत्वाच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पक्षात खळबळ उडाली आहे. शर्मा यांनी रविवारी पक्षाच्या परराष्ट्र धोरण विभागाचे अध्यक्षपद तडकाफडकी सोडले. एककीडे मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावरून पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्याकडून संसदेत आणि संसदेबाहेरही जोरदार हल्ला चढविला जात आहे. त्यात शर्मा यांच्या राजीनाम्याने चर्चांना उधाण आले आहे.
शर्मा हे मागील काही वर्षांपासून या विभागाचे प्रमुख होते. आता नव्याने या विभागाची बांधणी करणे आणि तरुण नेत्यांना संधी देण्यासाठी या पदाचा राजीनामा देत असल्याचे कारण शर्मा यांनी राजीनाम्यामध्ये दिले आहे. ते काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते असून त्यांच्या अचानक राजीनाम्यामुळे आत तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.
शर्मा यांनी म्हटले आहे की, आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षांना याबाबत कल्पना दिल्याप्रमाणे या विभागात तरूण नेतृत्वाला संधी देण्यासाठी नव्याने बांधणी करण्याची गरज आहे. त्यामाध्यमातून विभागाचे कामकाज सुरू राहण्याची खात्री मिळू शकेल, शर्म यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी लिहिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.
शर्मा हे काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे सदस्य आहेत. ते या पदावर कायम असतील. पक्षातील ही निर्णय घेणारी सर्वोच्च समिती आहे. शर्मा हे यूपीए सरकारमध्ये परराष्ट्र मंत्रीही होते. जवळपास चार दशके ते पक्षाची परराष्ट्र विषयक धोरणांशी संबंधिक भूमिका देशभरात आणि जागतिक पातळीवरही मांडत होते. आता त्यांनी यातून अंग काढून घेतले आहे.
भारत आणि अमेरिकेतील न्युक्लिअर करारात शर्मा यांची महत्वाची भूमिका होती. ऑपरेशन सिंदूरनंतर मोदी सरकारने जगभरात पाठविलेल्या विविध शिष्टमंडळापैकी एका शिष्टमंडळाचे ते सदस्यही होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याला आणखी महत्व प्राप्त झाले आहे.
ऑपरेशन सिंदूरवर संसदेत झालेल्या चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार टीका केली होती. प्रामुख्याने शस्त्रसंधी रोखल्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावरून राहुल सातत्याने निशाणा साधत आहेत. तसेच ट्रम्प यांच्या टेरिफ बॉम्बनंतर सरकारच्या परराष्ट्र धोरणांवर टीका होऊ लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.