Jyoti Mete Sarkarnama
महाराष्ट्र

Jyoti Mete News : ज्योती मेटेंकडे शिवसंग्रामची मोठी जबाबदारी; विधानसभेच्या 'इतक्या' जागा लढणार

Political News : पुण्यात रविवारी शिवसंग्राम पक्षाची सर्वसाधारण सभा पार पडली. यामध्ये नवीन कार्यकारणी जाहीर केली. त्यामध्ये ज्योती मेटेंकडे शिवसंग्रामची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली.

Sachin Waghmare

Pune News : राज्यात आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. या निवडणुकीसाठीची रणनीती आखली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यात रविवारी शिवसंग्राम पक्षाची सर्वसाधारण सभा पार पडली. यामध्ये आगामी काळात पक्षाची राजकीय भूमिका काय असणार? यावर चर्चा झाली. यावेळी नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये ज्योती मेटेंकडे शिवसंग्रामची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ज्योती मेटे यांनी शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मात्र, त्यांनी लोकसभा निवडणुकीत कोणालाच जाहीर पाठिंबा दिला नव्हता. पुण्यात रविवारी शिवसंग्राम पक्षाची (Shivsangarm Paksh) सर्वसाधारण सभा ज्योती मेटे (Jyoti Mete) यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडली. यावेळी शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्ष म्हणून ज्योती मेटे यांची निवड करण्यात आली. यावेळी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी त्यांनी केली असल्याचे सांगितले.

या बैठकीत शिवसंग्राम पक्ष विधानसभेच्या किमान ५ विधानसभा जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासॊबत आमची चर्चा सुरू आहे. मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या पाच विभागात किमान पाच जागा पाहिजे असल्याचे यावेळी ज्योती मेटे यांनी स्पष्ट केले.

या सभेस राज्यभरतील सर्व सभासद उपस्थितीत होते. आगामी काळातील राजकीय भूमिका काय असणार यावर चर्चा झाली. यावेळी नवीन कार्यकारणी जाहीर झाली. शिवाजी महाराज स्मारक आणि मराठा आरक्षण यावर चर्चा करण्यात आली. त्यासोबतच त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यात येणार आहे.

आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ज्योती मेटे उतरणार असल्याचे समजते. बीडमधून त्यांनी चाचपणी सुरू केली आहे. आम्ही निवडणुका ज्या ठिकाणी जिंकेल असे वाटतं त्याच ठिकाणी लढवणार असल्याची माहिती त्यांंनी यावेळी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांची राजकीय भूमिका ठरली नाही त्यामुळे त्यांच्याशी बोलणी झाली नाही, आम्ही सगळ्यांशी बोलणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्वपक्षीय बैठकीला बोलावल्यास जाणार

आरक्षण मुद्द्यावर सरकारने सर्वपक्षीय बैठकीला बोलावले तर जाणार आहोत. या बैठकीला आम्हाला बोलावलंच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. विनायक मेटे हे आरक्षणासाठी अनेक वर्षे लढत होते. त्यामुळे आम्हाला बोलावले पाहिजे, असेही ज्योती मेटे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT