Parbhani Assembly Election: विधानसभेला परभणी जिल्ह्यावर कोण वर्चस्व गाजवणार?

Political News : परभणी जिल्ह्याची ओळख शिवसेनेचा बालेकिल्ला अशीच राहिली आहे. अलिकडच्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राजकीय समीकरण बदलली आहेत.
NDA V/S INDIA
NDA V/S INDIAsarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : परभणी जिल्ह्यात पाथरी, जिंतूर, गंगाखेड आणि परभणी असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. परभणी जिल्हा हा दिग्गज नेतेमंडळींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परभणी जिल्ह्याची ओळख शिवसेनेचा बालेकिल्ला अशीच राहिली आहे. अलिकडच्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राजकीय समीकरण बदलली आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता ताणली गेली आहे.

परभणी जिल्हा हा ओबीसी बाहुल असल्याने याठिकाणी ओबीसी मतदारांची संख्या मोठी आहे. विशेषता ओबीसी समाजात लिंगायत, धनगर, माळी, बंजारा, वंजारी व राजपूत हा समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्या खालोखाल मराठा, मुस्लिम व दलित समाजाचे मतदान आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी या मतदारसंघातून हॅटट्रिक केली आहे. त्यांनी महायुतीकडून रिंगणात उतरलेले रासपचे उमेदवार महादेव जानकर (Mahadev Jankar) यांचा पराभव केला. गंगाखेड विधानसभा मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघात ठाकरे गटाच्या संजय जाधव यांना आघाडी आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

पक्षीय बलाबल

परभणी जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत तर जिंतूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर गंगाखेड विधानसभा मतदारसंघात रासपचे आमदार तर पाथरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. काँग्रेस एक, भाजप एक, रासप एक व शिवसेना ठाकरे गट एक असे पक्षीय बलाबल आहे.

NDA V/S INDIA
Ajit Pawar News : अजित पवारांची लाडक्या बहिणीसाठी आणखी एक मोठी खुशखबर; पुढच्या पाच महिन्यांत...

परभणी जिल्ह्यात कोणत्या पक्षाचे किती आमदार

जिंतूर मेघना बोर्डीकर (भाजप)

परभणी राहुल पाटील (शिवसेना)

गंगाखेड रत्नाकर गुट्टे (रासप)

पाथरी सुरेश वरपुडकर (काँग्रेस)

2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं होतं?

परभणी विधानसभा मतदारसंघ :

परभणी विधानसभा मतदारसंघात गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत. त्यामुळे या मतदारसंघाची ओळख शिवसेनेचा बालेकिल्ला अशीच राहिली आहे. विशेषतः या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार राहूल पाटील हे हॅट्ट्रिकवर आहेत. सलग दोन वेळा विजय त्यांनी मिळवला आहे. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या रविराज देशमुख यांचा पराभव केला होता. या वेळेसच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे राहुल पाटील पुन्हा मैदानात उतरणार आहेत तर त्यांच्या विरोधातील उमेदवार ठरला नसून महायुतीकडून उमेदवाराची चाचपणी केली जात आहे.

NDA V/S INDIA
MVA News: सर्व्हेमुळे ठाकरे गटाची धडधड वाढली; 'मविआ'त काँग्रेसच सर्वाधिक जागा लढणार

जिंतूर विधानसभा

2019 मध्ये हा मतदारसंघ भाजपने जिंकला होता. 2019 मध्ये भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजय भांबळे यांचा पराभव करून जागा जिंकली होती. या निवडणुकीत भाजपकडून मेघना बोर्डीकर पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत तर त्यांच्या विरोधातील महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला नाही. ही जागा काँग्रेसला सुटणार की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ठरणार यावर उमेदवार आहे. शरद पवार गटाकडून विजय भांबळे तर काँग्रेसकडून सुरेश नागरे हे इच्छुक आहेत.

गंगाखेड विधानसभा

2019 च्या विधानसभा निवडणुकीत गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून रासपचे रत्नाकर गुट्टे हे विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मधुसूदन केंद्रे यांचा पराभव केला होता. सध्या मधुसूदन केंद्रे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. या निवडणुकीत पुन्हा रासपचे रत्नाकर गुट्टे हे इच्छुक आहेत तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण निवडणूक लढणार हे अद्याप ठरलेले नाही.

NDA V/S INDIA
BJP and Vidhan Sabha Election: 'भाजपच ठरणार मोठा पक्ष' ; 'या' सर्व्हेने वाढवली महाविकास आघाडीची धाकधूक

पाथरी विधानसभा

2019 च्या विधानसभा निवडणुकीत पाथरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सुरेश वरपुडकर यांनी विजय संपादन केला होता. त्यांनी भाजपच्या मोहन फड यांना धूळ चारली होती. काँग्रेसने आमदार सुरेश वरपुडकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. माजी आमदार बाबजानी दुर्रानी यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला आहे. ते विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत. महायुतीचा उमेदवार अद्याप ठरला नसल्याने उत्सुकता आहे.

NDA V/S INDIA
Latur Assembly Election: दोन माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्र्यांना पराभूत करणाऱ्या लातूरकरांच्या मनात चाललंय तरी काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com