Mumbai MTNL Cable Theft Case; AI Photo sarkarnama
महाराष्ट्र

Crime News : मुंबईतील भाजपचा पदाधिकारी चोरीच्या प्रकरणात Wanted : शोधासाठी पोलिसांची स्पेशल टीम रवाना

Mumbai Kandivali MTNL Underground Cable Theft Case : मुंबईतील कांदिवली पूर्वेतील एमटीएनएलच्या भूमिगत केबल चोरीप्रकरणात समतानगर पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

Aslam Shanedivan

Mumbai Crime News : मुंबईमध्ये कांदिवली पूर्वेतील अशोक नगर परिसरात झालेल्या एमटीएनएलच्या भूमिगत केबल चोरीप्रकरणात समतानगर पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणात पोलिसांनी १३ जणांना बेड्या ठोकल्या असून, तब्बल २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे कसून केलेल्या चौकशीत या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या उत्तर-पश्चिम मुंबई जिल्ह्याचा उपाध्यक्ष आदित्य घुगे असल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पूर्व येथील अशोक नगर क्रॉस रोड क्रमांक ४ मधून भूमिगत एमटीएनएल कंपनीच्या २००० पेअरच्या चार केबल चोरीला गेल्या होत्या. ही घटना २२ जून रोजी घडली होती. चोरी झालेल्या केबलची किंमत ९ लाख ५०० रुपये इतकी होती.

या चोरीनंतर एमटीएनएलचे व्यवस्थापक विरेंद्र ललताप्रसाद यादव (वय-५२) यांनी समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला होता.

तपासादरम्यान पोलिसांना या टोळीचा सुगावा लागला आणि पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली. तसेच एकूण २०.८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींकडे केलेल्या कसून चौकशीत या चोरीमागच्या मुख्य मास्टरमाइंडचा भांडाफोड झाला. तर या संपूर्ण केबल चोरीच्या मागे आदित्य घुगे असल्याचे समोर आले. तसेच या चोरीप्रकरणात आदित्य घुगेचे मुख्य साथीदार सुबोध मोरे आणि अयुब खान असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

दरम्यान, मुख्य मास्टरमाइंड आदित्य घुगे याच्यासह त्याचे मुख्य साथीदार सुबोध मोरे आणि अयुब खान हे तिघेही फरार असून, त्यांचा शोध समतानगर पोलीस घेत आहेत. तर यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून, ती रवाना करण्यात आली आहेत. तसेच मुंबईतील इतर केबल चोरीच्या घटनांमध्ये या टोळीचा सहभाग आहे का, याचाही तपास समतानगर पोलीस करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT