

आंध्रप्रदेशमधील जनसेना पक्षाते नेते आणि राज्यसभा खासदार लिंगमनेई रमेश यांच्या मुलाने एस्टॉन मार्टीन कारच्या धडकेत 26 वर्षीय सेल्सगर्लचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माधापूर परिसरातील इनऑर्बिट मॉलजवळ 16 ऑगस्ट रोजी हा अपघात झाला.
या प्रकरणात खासदार लिंगमनेनी रमेश यांचा 21 वर्षीय मुलगा लिंगमनेनी संजुश हा कार चालवत असल्याचे सायबराबाद पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. संजुश याच्यावर भरधाव आणि निष्काळजीपणे कार चालवल्याचा आरोप आहे.
मृत महिलेचे नाव भारती मुखी असून त्या इनऑर्बिट मॉलमधील Lifestyle Clothing Store मध्ये सेल्सगर्ल म्हणून काम करत होती. रविवारी दुपारी सुमारे 3 वाजता त्या सहकारी पूजा अलोन यांच्यासोबत जवळच्या हॉटेलमध्ये लंचसाठी गेल्या होत्या. जेवण झाल्यानंतर दोघी कामाच्या ठिकाणी परतत असताना मॉलसमोर रस्ता ओलांडताना भारती यांना TG-09-G-0666 क्रमांकाच्या Aston Martin कारने जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात भारती यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. अपघातानंतर त्यांना त्याच कारमधून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भारती यांच्या सहकारी पूजाने स्टोअर मॅनेजर अश्विन कुमार यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना या अपघाताची माहिती देण्यात आली.
FIRमध्ये कार भरधाव आणि निष्काळजीपणे चालवली जात असल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या BNS कलम 106(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजुशचे वडील लिंगमनेनी रमेश हे व्यावसायिक असून आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाचे राज्यसभा खासदार आहेत. त्यामुळे या अपघाताच्या प्रकरणाने राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबराबाद पोलिसांकडून सुरू असून अपघाताच्या वेळी कारचा वेग किती होता आणि नेमकी परिस्थिती काय होती, याचा तपास केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.