Kapil Patil
Kapil Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Kapil Patil News: नेहमीच सरकारवर तुटून पडणाऱ्या कपिल पाटलांची आज चक्क चहापानाला हजेरी; त्यांनीच सांगितले कारण..

Sachin Waghmare

Mumbai News : राज्याचे पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरूवात होत आहे. 14 व्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधकांना मिळालेल्या या यशामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. त्यातच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होत असलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला होता. या चहापानाच्या कार्यक्रमाला आमदार कपिल पाटील यांनी हजेरी लावत सर्वांचे लक्ष वेधले.

विरोधकांचा चहापानावर बहिष्कार असला तरी मी महाराष्ट्राची परंपरा जपण्यासाठी आणि माझ हे शेवटचे अधिवेशन आहे. त्यामुळे एक महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे मी चहापानाच्या कार्यक्रमाला आलो आहे. एकीकडे एक भूमिका घ्यायची आणि सभागृहात वेगळी भूमिका घ्यायची, असा मी अजिबात करत नाही, असे सांगत आमदार कपिल पाटील (Kapil Patil) यांनी चहापानाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. (Kapil Patil News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) मला चहापानाला आवर्जून बोलवले होते. त्यामुळे मी चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. बहिष्कार टाकायचा व त्यानंतर अधिवेशनावेळी सरकारी बिलांना पाठिंबा दर्शवायचा, असा प्रकार मी करीत नाही. अधिवेशनापूर्वीच्या होणाऱ्या चहापानावेळी विविध मुद्द्यावर चर्चा करता येते.

त्यासोबतच अधिवेशनात कुठल्या विषयावर चर्चा होणार आहेत ते सर्व मुद्दे पुढे येतात. सरकारी बिलांना पाठिंबा दर्शवत व लोकोपयोगी बिलांना विरोध करण्याचे काम मी करीत नाही, ही माझी ठाम भूमिका असल्याचे कपिल पाटील म्हणाले.

राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. पाऊस अजून सुरु झालेला नाही, दुसरीकडे विद्यापीठाचे प्रश्न आहेत. त्यासोबतच राज्यतील जनतेला असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे तर शेतकऱ्यांचे प्रश्नदेखील सुटले नाहीत, असेही कपिल पाटील म्हणाले.

विधिमंडळात मी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख (Ganptrao Deshmukh) यांच्यासोबत काम केले आहे. ते नेहमी म्हणत असत की चहापानाच्या कार्यक्रमाला गेले पाहिजे व चर्चा केली पाहिजे. सभागृहात मात्र जनविरोधी बिलांना कायद्याने विरोध केला पाहिजे, असेही पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT