Devendra Fadanvis News : अधिवेशनाआधीच फडणवीसांनी तापवलं वातावरण; विरोधकांना घेरण्याचाही सांगितला प्लॅन

Political News : खरे म्हणजे खोटे अन खोटे बोल पण रेटून बोलण्याचा प्रकार आहे. खोटे नॅरेटिव्ह तयार करुन आता खोटचं बोलायचं अश्या मानसिकतेत विरोधीपक्ष गेला असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadanvis
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadanvis Sarkarnama

Mumbai News : राज्य सरकार उद्यापासून अधिवेशानाला सामोरे जात आहे. आज विरोधी पक्षाने प्रथेप्रमाणे चहापानावर बहिष्कार टाकत जे पत्र दिले आहे. ते खरे म्हणजे खोटे अन खोटे बोल पण रेटून बोलण्याचा प्रकार आहे. खोटे नॅरेटिव्ह तयार करुन आता खोटचं बोलायचं अश्या मानसिकतेत विरोधीपक्ष गेला आहे. विरोधकांनी आरशात आपला चेहरा पहावा असे हे पत्र असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

राज्याचे पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरूवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. (Devendra Fadanvis News)

विदर्भातील सिंचनाचे प्रकल्पात अपयश आले. आता हे कोण बोलत जे अडिच वर्ष होते तेव्हा एकही प्रकल्प मार्गी लागला नाही. आपण 87 प्रकल्प पूर्ण करत आलो आहोत. मागे एकही फाईल मुंगीच्या चालीएवढी पण हलली नाही आणि हे आम्हाला पत्रात आम्हाला प्रश्न विचारत आहेत. त्यांनी स्वतला प्रश्न विचारले पाहिजे. त्यांच्या काळात विदर्भातील एकाही प्रकल्पाला मंजुरी का नाही मिळाली, असा सवाल फडणवीस यांनी केला.

मराठवाडा वाॅटरग्रीड आम्ही सुरु केली होती ते बंद मविआ सरकारच्या काळात झाली. आम्ही हर घर जल योजनेत हा प्रकल्प सामाविष्ट करा आणि आम्ही पाठपुरावा करत आहोत. सर्वात जास्त पेपरफुटी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना झाल्या आणि ते आम्हांला प्रश्न विचारत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadanvis
Video Vijay Wadettivar News : चहापानावर विरोधकांचा बहिष्कार; महायुतीचे सरकार विश्वासघातकी, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

आम्ही या अधिवेशनात सगळ मांडू

गुंतवणूकदारांनी महाराष्ट्राकडे पाठ फिरवली असे म्हणत आहेत. त्यांच्या काळात मागे गेलेलं राज्य आता आमच्या राज्यात पुढे आले हे ते विसरत आहेत. त्यांच्या काळात उच्च न्यायालयाने गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा, असे सांगितले होते. आम्ही ड्रग्सच्या विरोधात कारवाईला सुरवात केली आहे. पोर्शे कार प्रकरणात सरकारने अतिशय कडक भूमिका ठेवली आहे. सरकार कारवाई करत राहणार आहे. विरोधीपक्षाने जे काही प्रश्न उपस्थित केलेत. त्यांच्या काळात काय झाले आणि आमच्या काळात काय झाल हे आम्ही त्यांना अधिवेशनात उत्तर देऊ, असे फडणवीस म्हणाले.

विरोधकांनी सभागृहात बोलावे

विरोधी पक्ष जितके वेळा बोट आमच्यावर उगारतात तर चार बोट त्यांच्याकडे असतात. बाॅडी बॅगचा घोटाळा, खिचडी घोटाळा कोणी केला. विरोधक विसरले का? माझा सवाल आहे. आम्ही सर्व बाहेर काढणार. फक्त हंगामा करायचा आणि मिडियात जाऊन बोलायचे. त्यापेक्षा सभागृहात बोला. आम्ही सर्व उत्तर देऊ काय केले आणि काय करणार. एक अतिशय चांगला अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) मांडतील हा विश्वास मला असल्याचे फडणवीस म्हणाले.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadanvis
VIDEO : Devendra Fadnavis News : '...तर मग ड्रग्ज संदर्भात त्यांच्या काळात कायकाय होत होतं, हे देखील मला..' ; फडणवीसांचा सूचक इशारा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com