Deputy Sarpanch Pooja Patil of Khidrapur surprises all by voting against herself in a no-confidence motion sarkarnama
महाराष्ट्र

Khidrapur Politics : उपसरपंचबाईंनी घोळ घातला, स्वतःच्या विरोधात मतदान केलं अन् पद घालवलं

Khidrapur Deputy Sarpanch Pooja Patil : महिला उपसरपंचावर अविश्वासाचा ठराव आणण्यात आला होता. विशेष म्हणजे या ठरावाच्या बाजुने महिला उपसरपंचाने मतदान केले.

Rahul Gadkar

No-Confidence Motion : अविश्वास ठरावांमध्ये महिला उपसरपंचाने स्वतःच्याच विरोधात मतदान केल्याने त्यांना पदमुक्त करण्यात आले. झालेला घोळ लक्षात आल्यानंतर महिला उपसरपंचाने तहसीलदारांसमोर गोंधळ घातला.

शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर ग्रामपंचायतमध्ये हा प्रकार घडला. या प्रकारानंतर संबंधित उपसरपंच पूजा पाटील यांनी गोंधळ निर्माण झाल्याने चुकून स्वतःच्या विरोधात मतदान केलं, असे स्पष्टीकरण तहसीलदारांना दिले . त्यामुळे फेरमतदानाची मागणी केली. मात्र प्रशासनाकडून उपसरपंच पूजा पाटील यांची मागणी फेटाळली. त्यांना न्यायालयात दाद मागणीचा सल्ला यावेळी दिला. गोंधळलेल्या उपसरपंचांनी केलेल्या मतदानाची चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे.

शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर ग्रामपंचायत येथील उपसरपंच पूजा पाटील ह्या आम्हाला विश्वासात घेऊन काम करत नसल्याचा आरोप सदस्यांनी करत त्यांच्यावर सात सदस्यांनी एकत्र येत पूजा पाटील यांच्या विरोधात अविश्वास ठरावा आणला होता. 5 वाजता थेट अविश्वास ठराव दाखल केला होता. या ठरावावर निर्णय घेण्यासाठी तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेची अधिसूचना काढली.

विश्वासावर मतदान करण्याची प्रक्रिया 12 वाजता पार पडली. मात्र 10 सदस्यांपैकी एकाही सदस्याने पूजा पाटील यांच्या बाजूने मतदान केले नाही. विशेष म्हणजे पूजा पाटील या दहा मधीलच एक होत्या. त्यामुळे गोंधळलेल्या उपसरपंच पूजा पाटील यांनी स्वतःच्याच विरोधात मतदान केल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला.

दरम्यान, झालेला प्रकार लक्षात आल्यानंतर पूजा पाटील तहसीलदार यांच्याकडे आपण गोंधळून गेल्याने हा प्रकार झाल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यावर तहसीलदारांनी एकदा झालेले मतदान पुन्हा घेता येत नाही. असा खुलासा केला. तहसीलदार हेळकर यांनी ती फेटाळून लावत मतदान होऊन निकाल जाहीर झाला असून पुन्हा मतदान घेता येत नाही, असे स्पष्ट केले. तसेच, या निर्णयावर असमाधान असल्यास योग्य त्या न्यायालयात दाद मागण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT