Uma Bharti on Nathuram Godse : "नथुराम गोडसेने केलेलं पाप आतंकवाद्यांपेक्षाही मोठं..."; भाजपच्या कट्टर हिंदुत्ववादी नेत्या उमा भारती यांचं मोठं वक्तव्य

Uma Bharti Labels Godse’s Act Greater Than Terrorism : नथुराम गोडसेने केलेल्या पापाचे वर्णन करण्यासाठी केवळ दहशतवादी हा शब्द पुरेसा नाही, असं वक्तव्य भाजपच्या नेत्या तथा माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी केलं आहे. उमा भारती या कट्टर हिंदुत्ववादी नेत्या आहेत.
Uma Bharti on Nathuram Godse
Uma Bharti during a TV interview where she strongly condemned Nathuram Godse’s assassination of Mahatma Gandhi, calling it a sin beyond terrorismSarkarnama
Published on
Updated on

Uma Bharti on Nathuram Godse : नथुराम गोडसेने केलेल्या पापाचे वर्णन करण्यासाठी केवळ दहशतवादी हा शब्द पुरेसा नाही, असं वक्तव्य भाजप नेत्या तथा माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी केलं आहे. उमा भारती या कट्टर हिंदुत्ववादी नेत्या आहेत.

शिवाय रामजन्मभूमी चळवळीत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांनी गोडसेबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी नेते आजही नथुराम गोडसेचं समर्थन करतात. मात्र, उमा भारती यांनी गोडसेने आंतकवाद्यांपेक्षा मोठं पाप केल्याचं म्हटल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

उमा भारती नेमकं काय म्हटलं?

एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत उमा भारती यांना हिंदू कधी आतंकवादी असू शकत नाही, असं म्हटलं जातं. मात्र, दुसरीकडे असं म्हटलं जातं की, देशातील पहिला आतंकवादी नथुराम गोडसे हा हिंदू होता, असा प्रश्न विचारला. यावर उमा भारती म्हणाल्या, मी यावर काही बोलू शकत नाही.

Uma Bharti on Nathuram Godse
Women Reservation in Politics : राजकीय पक्ष संघटनेतही महिलांना आरक्षण मिळणार; अंमलबजावणीची जबाबदारी निवडणूक आयोगावर सोपवणार

कारण गोडसेने जे पाप केलं आहे. त्याला केवळ आतंकवादी म्हणून चालणार नाही. त्याने केलेलं पाप यापक्षाही मोठं आहे. त्याने अशा व्यक्तीची हत्या केली आहे जो स्वतंत्र भारत कसा असेल याचे स्वप्न पाहत होता. ते स्वतंत्र भारताच्या चळवळीचे नेतृत्व करत होते. त्यानंतर, स्वतंत्र भारत कसा असेल? यासाठी त्यांनी आत्मनिर्भर भारताची कल्पना केली होती.

आत्मनिर्भर भारत स्वतःच्या आत्म्यावर अवलंबून असेल. तो परदेशी कर्जांवर अवलंबून नसेल, असं स्वप्न गांधींनी पाहिलं होतं. त्यामुळे ही गांधींच्या स्वप्नाची हत्या असून दहशतवाद हा शब्द वापरून त्यांचे पाप कमी होऊ शकत नाही, असं परखड मत उमा भारती यांनी मांडलं.

Uma Bharti on Nathuram Godse
Jayant Patil-Ajit Pawar Video : पक्षफुटीनंतर जयंत पाटील-अजितदादा पहिल्यांदाच एका व्यासपीठावर, रोहित पवारही राहणार उपस्थित!

तसंच यावेळी त्यांना काही लोक गांधींजींचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान मानत नाहीत, त्याबाबत तुमचं काय मत आहे? असं विचारलं असता त्या म्हणाल्या, जे गांधींचं योगदान मानतात त्यांना मानू द्या. जे मानत नाहीत ते टीका करू शकतात, ज्याला त्याला आपलं मतं मांडायचं स्वातंत्र्य आहे.

मात्र, गांधींचं स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान आहे. त्यांनी अहिंसक आंदोलनाचं रुपांतर जनआंदोलन करण्याचं काम केलं. ते अजून वीस वर्ष जिवंत असते तर अमेरिकेने आपल्यावर टॅरिफ लावला नसता तर आपण अमेरिकेवर टॅरिफ लावला असता आणि अमेरिकेने आपल्यासमोर भीक मागितली असती, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com