Rajesh Kshirsagar  Sarkarnama
महाराष्ट्र

Kolhapur: थेट पाईपलाईन कामाची ED चौकशी करा; क्षीरसागरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र...

Rahul Gadkar

Kolhapur: थेट पाईपलाईन योजनेमध्ये काँग्रेसच्या एका नेत्यांनी 75 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. या प्रकाराची ईडीमार्फत चौकशी व्हावी, यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. थेट पाईपलाईनचे पाणी कोल्हापुरात पोहोचल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे साखर पेढे वाटून आनंद साजरा केला. त्यावेळी क्षीरसागर यांनी इशारा दिला आहे.

कोल्हापूर शहराला शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे. थेट पाईपलाईनद्वारे कोल्हापूरला पाणीपुरवठा करावा, यासाठी विधान भवनाच्या पायरीवर आमरण उपोषण करणारा मी पहिला आमदार आहे, हे साऱ्या जनतेला ठाऊक आहे. जिल्ह्यातील काँग्रेसचा एक नेता या योजनेचे श्रेय घेऊ पाहत आहे, पण थेट पाईपलाईनसाठी कोणी कोणी संघर्ष केला, लढा दिला हे सारे कोल्हापूरवासियांना माहित आहे." अशा शब्दात क्षीरसागर यांनी भूमिका मांडली.

उपोषण केल्याचा दावा

२००९ मध्ये कोल्हापुरातून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर शहराला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा व्हावा, थेट पाईपलाईन योजना कार्यान्वित करावी यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यावर मी आमरण उपोषण केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अर्थमंत्री अजित पवार, नगर विकास राज्यमंत्री भास्कर जाधव, कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर मी उपोषण मागे घेतले होते.

सगळे माझ्यामुळेच घडते...

कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या एका नेत्याला वाटते की सगळे माझ्यामुळेच घडते. त्यामुळे ऊठसूठ ते प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्याचे प्रयत्न करत असतात. मी उपोषण केल्यावर मला श्रेय मिळू नये, म्हणून काँग्रेसच्या त्या नेत्याने त्यावेळीही खटाटोप केला. शुक्रवारी रात्रीही काँग्रेसच्या नेत्याने पुईखडी प्रकल्प येथे जाऊन गुलाल उधळला. मात्र कोल्हापुरातील जनतेला थेट पाईपलाईन योजनेसाठी कोणी कोणी संघर्ष केला लढा दिला हे सगळे ठाऊक असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT