Jat Panchayat Sarkarnama
महाराष्ट्र

Jaat Panchayat : एकट्या महिलेने हजारोंचा समुदाय पळवुन लावला, रोखली जातपंचायत; मढीच्या यात्रेत होणार होता न्यायनिवाडा

Nashik Jaat Panchayat of Vaidu community : भटके विमुक्त समाजातील सर्वोच्च वैदु समाजाची जातपंचायत होण्यासाठी शनिवारी नारळ फुटले होते. तर रविवारी सकाळी अकरा वाजता जातपंचायतीत न्यायदान होणार होते.

Sampat Devgire

Nashik News : नाशिक येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या कोमल वर्दे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील भटक्यांची पंढरी समजल्या जाणाऱ्या मढी येथे जातपंचायत उधळवून टाकली. येथील कानिफनाथ यात्रेत वैदु समाजाची जातपंचायत होणार होती. जी कोमल वर्दे यांनी एकट्या उभे राहत उधळलीय. यामुळे पंचक्रोशीत केवळ एकट्या महिलेने हजारोंचा समुदाय पळवुन लावला अशा शब्दात त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

महाराष्ट्र शासनाने जातपंचायत विरोधी कायदा संमत केलेला आहे. यामुळे जातपंचायत बसणे, हे कायद्याने गुन्हा आहे. पण मढी येथे भटके विमुक्त समाजातील अनेक जातपंचायत भरतात. याच कायद्यामुळे गेल्या आठ वर्षापासुन जातपंचायत बसणे बंद झाले होते. पण आता पुन्हा एकदा या जातपंचायतींना सुरूवात झाली असून या वर्षी भटके विमुक्त समाजातील सर्वोच्च वैदु समाजाची जातपंचायत होणार होती. यासाठी शनिवारी (ता.22) नारळ फोडण्यात आले होते. तर रविवारी सकाळी अकरा वाजता न्यायनिवाडा होणार होता.

पण याची माहिती जातपंचायत मुठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांना मिळाली. याची माहिती त्यांनी डॉ. टी. आर. गोराणे, ॲड रंजना गवांदे, कोमल वर्दे यांना दिली. ज्यानंतर कोमल वर्दे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला व पाथर्डी चे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना तक्रार अर्ज पाठवला. त्यावर त्यांनी तत्काळ कार्यवाही करत मढी येथील यात्रेत जातपंचायतची पहाणी करण्यासाठी पथक पाठविले. पोलीस पथकाने अशी जातपंचायत घेता येणार नाही. शिवाय सदरचे कृत्य बेकायदेशीर असल्याची जाणीव करवून दिली. पोलीसी खाक्यामुळे मातब्बर जातपंचांनी नमते घेतले. परंतु मेळाव्याच्या नावाखाली वैदु भाषेत त्यांनी जातपंचायत चालु ठेवली.

यावरून अंनिसच्या कार्यकर्त्या कोमल वर्दे यांनी वैदु भाषा समजत असल्याने जातपंचायत बंद करण्यासाठी प्रयत्न केले. तसे पोलीसांच्या लक्षात आढुन दिले. मग पोलीस आल्याने जातपंचायतीचे लोक पळुन गेले. जातपंचायतीचे लोकच पळून गेल्याने पिडीत व्यक्तींनी पंचांच्या कचाट्यातुन सुटल्याने आनंद व्यक्त केला. अंनिसचे पोलीसांचे अभिनंदन केले आहे. या मोहिमेत पोलीस निरीक्षक विलास जाधव,पोलीस निरीक्षक निवृत्ती आगरकर, पोलीस हवालदार अदिनाथ बढे, पोलिस नायक सुकदेव धोत्रे, पो,कॉ. ज्ञानेश्वर सानप, वाघ आदींनी सहभाग घेतला.

तर जातपंचायतचीच्या नावाखाली तर कुणावर अन्याय होत असल्यास कृष्णा चांदगुडे 9822630378 यांच्याशी संपर्क करावा ,असे आवाहन यावेळी करण्यात आले.

वैदु समाजाची जातपंचायत ही राज्यातील सर्वोच्च जातपंचायत आहे. ती मागे कायमची बरखास्त करण्यात आली होती. तरीही इतके दिवस छुप्या पद्धतीने चालणारी जातपंचायत उघडपणे करण्याची हिंमत पंच करत असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे"
-कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, जातपंचायत मूठमाती अभियान (अंनिस)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT