aaditya thackeray rane worker clash in rajgad fort  sarkarnama
कोकण

Rajkot Fort Rada : राणे अन् ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा! आदित्यही चिडले, म्हणाले; मला ते घाबरतात, कारण...

Thackeray vs Rane :आदित्य ठाकरे आणि माजी मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या समर्थकांसह एकाचवेळी राजकोटवर पोहोचले. तेव्हा, राणे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमने-सामने आले.

Akshay Sabale

Malvan Rajkot Fort Rada: छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणधील राजकोट किल्ल्यावर असलेला पुतळा कोसळ्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते पोहोचले. शिवसेना ( ठाकरे गट ) नेते, आमदार आदित्य ठाकरे किल्ल्यावर पोहोचताच ठाकरे राणे समर्थक त्यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी ठाकरे आणि राणे यांचे एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं.

आदित्य ठाकरे आणि माजी मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या समर्थकांसह एकाचवेळी राजकोटवर पोहोचले. आदित्य ठाकरे किल्ल्यात येताच राणे यांचे कार्यकर्ते आदित्य ठाकरे अंगावर धावून गेले. यानंतर शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार वैभव नाईक आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते राणेंच्या कार्यकर्त्यांशी भिडले. पोलिसांनाही मध्यस्थी करताना नाकीनऊ आले.

या घटनेनंतर आदित्य ठाकरे राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर चांगलेच चिडल्याचं पाहायला मिळालं. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, "आम्ही किल्ल्यात निट येते होतो. ही लढाई करण्याची जागा आहे का? ही बालबुद्धी किती दिवस सहन करायची. 100 टक्के माझ्यावर हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. कारण, ते मला ते घाबरतात. माझ्या खिशात कोंबड्या नाही आहेत."

"सहा महिन्यांमध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला आहे. जूनमध्ये डागडुजीसाठी पत्र गेले होते. मात्र, लगेच कसा काय गंज चढला? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खूश करण्यासाठी आणि निवडणुकीच्या आधी पुतळा उभा केल्यानं, हे सगळं झालं आहे," अशी टीका आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केली आहे.

"आपटे नावाचा मुलगा कुठे आहे? तो फरार झाला आहे. गद्दार गँगचे निर्ल्लज्ज मंत्री येथे येऊन गेले आहेत. त्यांनी सांगितलं अजून काहीतरी नवीन करू.. म्हणजे अजून पैसे कमावयाचे आहेत त्यांना... त्यांना मंत्री म्हणून फिरताना लाज वाटली पाहिजे," असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT