VIDEO : मोठा राडा! राजकोट किल्ल्यावर राणेंचे समर्थक आदित्य ठाकरेंच्या अंगावर धावून गेले अन्...

Rane Against Thackeray At Rajkot Fort : राजकोट किल्ल्यावर राणे आणि ठाकरे यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यामुळे एकच तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
aaditya thackeray rane worker clash in rajgad fort
aaditya thackeray rane worker clash in rajgad fortsarkarnama
Published on
Updated on

Mahavikas Aghadi and BJP activists Supporters Fight on Rajkot Fort : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला आहे. त्यापार्श्वभूमवीर शिवसेना ( ठाकरे गट ) नेते, आमदार आदित्य ठाकरे हे राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी गेले आहेत.

दुसरीकडे माजी मंत्री, खासदार नारायण राणे यांच्यासह मोठ्या संख्येने समर्थक किल्ल्यावर आले होते. यावेळी आदित्य ठाकरे किल्ल्यावर येताच राणेंचे समर्थक त्यांच्यावर अंगावर धावून गेले. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

नेमकं घडलं काय?

आदित्य ठाकरे, आमदार वैभव नाईक, माजी खासदार विनायक राऊत हे राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पाहण्यासाठी आले होते. किल्ल्यावर प्रवेश करत राणे समर्थक आदित्य ठाकरे यांच्या अंगावर धावून गेले. दुसरीकडे ठाकरे यांचे समर्थक आणि आमदार वैभव नाईक राणे समर्थकांच्या अंगावर गेले. तेव्हा, पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.

यानंतर आदित्य ठाकरे यांनी किल्ल्यावर जाऊन पुतळ्याची पाहणी केली. मात्र, निलेश राणे आणि त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. आदित्य ठाकरे प्रसारमाध्यमांना संवाद साधताना त्यांच्या अंगावर राणेंच्या कार्यकर्त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी ठाकरेंच्या एका कार्यकर्त्याला राणेंच्या कार्यकर्त्यांना जोरदार चोप दिला आहे.

यावेळी पोलिसांनी नारायण राणे, नितेश राणे आणि कार्यकर्त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, नारायण राणे म्हणाले, "आम्ही आमच्या भागात आहोत. बाहेरचे येऊन येथे दादागिरी करणार असतील, तर आम्ही येथून जाणार नाही. वाटल्यास आम्हाला गोळ्या घाला. असे आं***, पां**** आयुष्यभर पाहिले आहेत."

निलेश राणे यांनी पोलिसांना म्हटलं, "तुम्ही त्याला आणलं कशाला... तुम्हाला वेळ सांगितली होती. चूक पोलिसांची आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com