Amit Palekar criticized Narayan Rane Sarkarnama
कोकण

AAP Maharashtra News : '...तर 'आप'देखील महाराष्ट्रात उमेदवार उभा करणार'; अमित पालेकरांचे विधान!

Amit Palekar criticized Narayan Rane : 'स्थानिकांनी नारायण राणे यांच्या सूडाच्या राजकारणाची वीट आला असून, ते..', असेही पालेकर म्हणाले आहेत.

Mayur Ratnaparkhe

AAP on Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारी याद्या जाहीर केल्या जात आहेत. अनेक इच्छुक पक्ष बदल करत आहेत. तर फोडाफोडीच्या राजकारणालाही पेव फुटले आहे. राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुटीनतंर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने ती अनेकार्थाने महत्वाची मानली जात आहे. महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी थेट लढाई जरी दिसत असली, तरी राज्यात तिसरी परिवर्तन आघाडी शिवाय मनसे यांचेही आव्हान असणार आहे.

आता विरोधकांच्या इंडिया आघाडीचा भाग असणारी अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांचा आम आदमी पार्टी देखील महाराष्ट्राची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. आम आदमी पार्टीचे गोवा प्रमुख अमित पालेकर यांनी कोकणात याबाबत भाष्य केले आहे.

अमित पालेकर(Amit Palekar) आम आदमी पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी आहेत. कुडाळ येथे आयोजित पक्षाच्या एका कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले असता, त्यांनी निवडुकीबाबत भाष्य केले.

कोकणात पक्ष मजबूत करण्याबाबत पालेकरांनी भाष्य केले. आम आदमी पक्ष विशेषत: कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसेच कोल्हापुरात पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

आगामी निवडणुकीत इंडिया आघाडीसोबत आम आदमी पक्ष(AAP) पूर्ण ताकदीने उभा आहे. पण, आघाडीने परवानगी दिल्यास जिंकण्याची शक्यता असणाऱ्या काही जागांवर उमेदवार देण्याचा विचार आम्ही करत आहोत, अशी माहिती पालेकरांनी दिली.

कोकणात आम आदमी पक्ष वाढल्याचा दावा यावेळी पालेकरांनी केला. तसेच, कोकणतील स्थानिकांनी नारायण राणे यांच्या सूडाच्या राजकारणाची वीट आला असून, ते भाजपला पर्याय शोधत आहेत, असेही पालेकर म्हणाले.

इंडिया आघाडीचा भाग म्हणून शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीला आम आदमी पक्षाचा पाठिंबा असल्याचे पालेकर म्हणाले. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर येथील आपच्या कार्यकर्त्यांकडून उमेदवार देण्यासाठी दबाव आहे, असे अमित पालेकर म्हणाले.

(Edited by - mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT