Raigad Gram Panchayat Election; NCP MLA Aditi Tatkare sarkarnama
कोकण

Gram Panchayat Election : आदिती तटकरेंची ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नवी रणनीती; गावातील मतभेद कमी करण्यासाठी प्लॅनही तयार

Aditi Tatkare On Gram Panchayat Election : कोकणात एकीकडे तटकरे विरूद्ध शिवसेना असा वाद सुरू झाला असतानाच दुसरीकडे मंत्री आदिती तटकरे यांनी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Aslam Shanedivan

Raigad News : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटल्यानंतरही येथील वाद अद्याप शांत झालेला नाही. मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील वाद काहीसा शांत झाला असतानाच शिवसेनेच्या आमदारांकडून तटकरेंना लक्ष्य केलं जात आहे. नुकताच आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंवर बोचरी टीका करत सल्ला दिला होता. ज्याला पलटवार करत आमदार अनिकेत तटकरे यांनी थेट इशारा दिला होता. यामुळे पुन्हा एकदा रायगडचे राजकारण तापले आहे.

पण या तापलेल्या राजकारणावर मंत्री आदिती तटकरे यांनी कोणतेही भाष्य केले नाही. उलट त्यांनी आगामी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीवर भाष्य केले आहे. त्यांनी, लोकसभा, विधान सभा, जिल्हा परिषद निवडणूकांपेक्षा सर्वात अधिक त्रास ग्राम पंचयत निवडणुकांमध्ये होतो, असे म्हटलं आहे. त्या रायगडमधील रोहा येथे घेण्यात आलेल्या युवक राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळाव्यात बोलत होत्या.

रायगड जिल्ह्यातील रोहा येथे युवक राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष राकेश शिंदे यांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा घेतला. यावेळी युवकांना राष्ट्रवादी काँग्रेसकडे आकर्षित करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या मेळाव्यात आमदार अनिकेत तटकरे, रायगड लोकसभा मतदारसंघ अध्यक्षा स्नेहल जगताप, रोहा नगराध्यक्षा वनश्री शेडगे, रोहा तालुकाध्यक्ष महेंद्र पोटफोडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राकेश शिंदे यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आदिती तटकरे यांनी, आगामी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आपला प्लॅन सांगितला. त्या म्हणाल्या, पूर्वी घरातील वडिलधारे मत ठरवत, त्याप्रमाणे मतदान होत असे. पण आता घरातील मुलगा किंवा मुलगी मत कुठं टाकायच ते सांगतात. ज्यानंतर कदाचित आई किंवा बाबा आपले मत कोणाला टाकायचं ते ठरवतात.

आता काळ बदलला असून राजकारणाची, समाजकारणाची पद्धत देखील बदलत असल्याचे आता दिसत आहे. आपला देश हा तरुणांचा, युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. कारण देशात सर्वाधिक लोकसंख्या ही तरूणांची आहे. यामुळे पुढच्या काळात देश, राज्य आणि जिल्ह्याच्या राजकारणात तरुणांचा सहभाग मोठ्या पद्धतीने पहायला मिळेल असेही आदिती तटकरे म्हटलं आहे.

यावेळी आदिती तटकरेंनी आगामी ग्राम पंचायत निवडणुकीच्या संदर्भात देखील भाष्य केलं आहे. त्यांनी आता ग्राम पंचायत निवडणूका येत असून माझी अपेक्षा ही जेवढ्या बिनविरोध होतील तेवढे चांगले होईल असे आहे. लोकसभा, विधान सभा, जिल्हा परिषद निवडणूकांपेक्षा सर्वात अधिक त्रास ग्रामपंचयत निवडणुकांमध्ये होतो. यामुळे सामज्यस्याने निवडणुका पार पडतील तेवढ गावातील मतभेद कमी होतील, असा विश्वास देखील तटकरे यांनी व्यक्त केलं आहे.

तसेच त्यांनी जमलेल्या तरूणांचा आव्हान देखील केलं आहे. त्यांनी यंदाच वर्ष अव्हानात्मक असून 358 तालुक्यांपैक 265 दुष्काळग्रस्त जाहिर झालेत. पावसाची स्थिती आपण सर्वांनीच अनुभवली असून याआधी कोकणात पावसामुळे दुष्काळ कधीही जाहिर झाला नव्हाता. दरम्यान याधी 1970-72, 2013 -14 मध्ये अशी परिस्थिती आली होती.

पण त्या पेक्षा वाईट आताची परिस्थिती आहे. यंदा पावसाच्या कमतरतेमुळे ही स्थिती उद्भवल्याचे आदिती तटकरे म्हणाल्या. तसेच भविष्यात आपापल्या तालुक्यात लोकप्रतिनिधी, पदाधिकारी म्हणून काही मदत कार्य कराव लागल तर राष्ट्रवादीची युवक संघटना मागे हटता कामा नये. सर्वात आग्रेसर राष्ट्रवादीची युवक संघटना असली पाहिजे असेही आवाहन त्यांनी केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT