Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकांपूर्वी राजकीय हालचालींना वेग, गणपतीसाठी गावाकडे परतलेल्या मतदारांवर नेत्यांचे लक्ष; पुढाऱ्यांची घरोघरी धाव

Raigad Gram Panchayat Election 2026 : राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून कोकणात देखील चाकरमान्यांनी जात आपल्या घरी गणपती आणला. यानंतर येथे ग्रामपंचायत निवडणुकांपूर्वी राजकीय हालचालींना वेग आल्याचे चित्र तयार झाले आहे.
Gram Panchayat Elections
Gram Panchayat ElectionsSarkarnama
Published on
Updated on

Raigad News : अमित गवळे

रायगड जिल्ह्यात आगामी ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय वातावरणात मोठी धामधूम सुरू झाली आहे. अलिबाग, महाड, कर्जत, पनवेल, रोहा, सुधागड यांसारख्या विविध तालुक्यांतील सुमारे साडेतीनशेंहून अधिक ग्रामपंचायतींची मुदत संपलेली असून सद्यस्थितीत तिथे प्रशासक कारभार पाहत आहेत. नुकतीच सदस्य आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये रोजगारासाठी स्थलांतरित झालेले नागरिक गणपती सणानिमित्त आपल्या मूळ गावी परतले आहेत. या हक्काच्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. गणेशोत्सवामुळे एरवी बंद असणारी गावांमधील घरे उघडली असून गावखेडी चाकरमान्यांच्या उपस्थितीने फुलून गेली आहेत. स्थलांतरित झालेले नागरिक शहरात राहत असले तरी बहुतांश लोकांचे मतदान अजूनही आपापल्या गावीच आहे. त्यामुळे हा वर्ग निवडणुकीच्या निकालात अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

हीच संधी साधून स्थानिक पुढारी आरती आणि दर्शनाच्या निमित्ताने थेट नागरिकांच्या घरी पोहोचत आहेत. दर्शनासोबतच चाकरमान्यांशी संवाद साधणे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे, जनसंपर्क वाढवणे आणि निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखणे सुरू आहे. सणउत्सवाच्या या माहौलातच आगामी स्थानिक निवडणुकांची राजकीय गणिते जुळवली जात आहेत.

Gram Panchayat Elections
Gram Panchayat Election : मोठी बातमी! ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर; 'या' कारणामुळे 4 ऑगस्टच्या मतदार यादीला स्थगिती

नागरिक जरी कामानिमित्त शहरात राहत असलो तरी त्यांची नाळ नेहमीच गावाशी जोडलेली असते. गावातील विकासकामे आणि तेथील लोकप्रतिनिधी कसा असावा यावर त्यांचे बारकाईने लक्ष असते. सणाच्या निमित्ताने गावी आल्यावर सर्व पक्षांचे कार्यकर्ते भेटायला येत आहेत आणि गावातील विविध समस्यांवर चर्चा करत आहेत. यामुळे मतदानाच्या दिवशी योग्य उमेदवाराची निवड करणे त्यांना सोपे जाईल.

एकंदरीत, आरक्षण निश्चितीनंतर वेगाने बदलणारे राजकीय चित्र आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी आलेला चाकरमानी वर्ग यामुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची रंगत ऐन सणउत्सवात अधिकच वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

गणपती दर्शनासाठी नेत्यांच्या घरी गेल्यावरती नागरिक सोशल मीडियावर आपले फोटो देखील अपलोड करत आहेत. तर अनेक कार्यकर्ते आमदार खासदार आणि स्थानिक पुढारी यांच्या गणेशाच्या दर्शनाला जाऊन आपल्या पदरी उमेदवारी कशी मिळेल हे देखील पाहत आहेत.  तसेच इच्छुक उमेदवार गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांसोबत संपर्क करत आहे. आपल्या कामाची माहिती देत आहेत. 

गणपती निमित्त गाव खेडे पुन्हा भरली आहेत आणि बंद असलेली घरे उघडली आहेत. स्थलांतरित नागरिक गावी परतले असून बहुतांश लोकांचे मतदान आपापल्या गावीच आहे. त्यांच्यासोबत हितगुज आणि संवाद साधला जात आहे. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत आहोत, तसेच आगामी निवडणुकीच्या संदर्भात त्यांना माहिती देखील देत आहोत.

सुनील साठे, अध्यक्ष, मनसे, सुधागड

जिल्ह्यातील 335 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. एसआरआय ची कामे झाल्यावर मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर होईल व त्यानंतर निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. साधारणपणे डिसेंबर पर्यंत ग्रामपंचायत निवडणुका लागण्याची किंवा तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. 

प्राची भोईर, सहाय्यक महसूल अधिकारी, सामान्य शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग

Gram Panchayat Elections
Gram Panchayat Election : 15 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात; राज्यात 60 हजार नवी EVM, अहिल्यानगरला सर्वाधिक यंत्रे

ग्रामपंचायत निवडणूक संक्षिप्त आकडेवारी

​रायगड जिल्ह्यातील मुदत संपलेल्या व लवकरच मुदत संपणाऱ्या ३३५ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया प्रस्तावित असून, प्राप्त यादीनुसार तालुकानिहाय अपडेटेड आकडेवारी खालीलप्रमाणे आहे: रोहा (४६), पनवेल (४१), महाड (४०), कर्जत (४०), अलिबाग (३८), माणगाव (२६), पेण (२५), तळा (२२), श्रीवर्धन (२०), उरण (१६), म्हसळा (१४), सुधागड (६), खालापूर (५) आणि मुरुड (४) अशी एकूण ३३५ ग्रामपंचायतींची निश्चित आकडेवारी समाविष्ट आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com