Rajan Salvi sarkarnama
कोकण

Rajan Salvi News : आमदार साळवींनंतर आता ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुखांवर गुन्हा दाखल

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri News : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अँटी करप्शनच्या पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांना अर्वाच्य व मानहानीकारक भाषेत बोलल्याने ठाकरे गटाचे युवा सेनेचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख अजिंक्य मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

आमदार राजन साळवी यांच्यावरती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (ACB) कारवाई झाल्याची माहिती समजल्यानंतर जिल्हाभरातून अनेक कार्यकर्ते पदाधिकारी राजन साळवी यांच्या रत्नागिरी येथील साहेब या बंगल्यावर जमले होते. त्यावेळी हा प्रकार घडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार राजन साळवी यांचे खेड येथील कार्यकर्ते अजिंक्य मोरे व त्यांचे कार्यकर्ते गुरुवारी 18 जानेवारी रोजी दुपारी चार वाजवण्याच्या सुमारास रत्नागिरी येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर आले होते.तेथे अजिंक्य मोरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी हे सार्वजनिक कर्तव्य पार पाडत असताना त्यांना उद्देशून पत्रकार व कार्यकर्त्यांच्या समोर बोलायला सुरुवात केली.

यावेळी बोलताना तो 'यानंतर एकापण शिवसेना(Shivsena) पदाधिकाऱ्यावर जर आला तर तुमच्या अधिकाऱ्यांच्याच पॅन्ट फाडणार, आमचे काय करायचे आहे ते करा तुम्ही, घ्या त्यांना बाहेर बोलवा, काय गोळ्या झाडायच्या आहेत त्या आमच्यावर झाडा, त्यांना फक्त बाहेर बोलवा, त्यांच्या पॅट काढून नागडी करून पाठवणार ' अशा प्रकारचे प्रक्षोभक वक्तव्य केलेल्या व्हिडिओ क्लिपची चर्चा सुरू होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकरणाची गंभीर दखल घेत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आल्यावर ती सायंकाळी चारच्या सुमारास खेड येथे वास्तव्य असणारे जिल्हाप्रमुख अजिंक्य मोरे यांच्या विरुध्द पोलीस (अप्रतीची भावना चेतावणी) अधिनियम 1922 चे कलम 3 व भादविक 186 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT