अलिबाग तालुक्यातील आक्षी-साखर येथे ग्रोयान्स बंधारा व जेट्टी पोहच रस्त्याचे भूमिपूजन नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाले.
शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी प्रकल्प आपल्या मागणीनुसार झाल्याचा दावा केला होता.
मात्र, नितेश राणे यांनी मच्छिमारांच्या मागणीनुसार प्रकल्प झाल्याचे सांगत हा दावा फेटाळला.
Alibag News : राज्यात महायुती असताना मात्र कोकणातील रायगडमध्ये वाद विकोपाला गेला होता. पालकमंत्री पदावरून सुरू झालेली रस्सी खेच महायुतीच्या फुटीचे कारण ठरण्यापर्यंत हा वाद गेला होता. पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यात लक्ष घातले आणि जिल्ह्यातील वादाला मूठमाती मिळाली. पण आता पुन्हा एकदा येथे वाद उफाळला असून शिंदेंची शिवसेना आणि भाजप आमने-सामने आली आहे. येथे अलिबाग तालुक्यातील आक्षी- साखर येथे ग्रोयान्स बंधारा, जेट्टी पोहच रस्त्याच्या भूमीपूजनावरून वाद सुरू झाला आहे. तर मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आणि आमदार दळवी यांच्यात यावरून वाद रंगला आहे.
अलिबाग तालुक्यातील आक्षी-साखर येथे ग्रोयान्स बंधारा, जेट्टी पोहच रस्ता आदी कामांचे भूमीपूजन भाजप नेते नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. मात्र हे काम आपल्या मागणीतूतन झाल्याचा दावा आमदार दळवी यांनी करत जाहीरातबाजी केली. यावरून आता वाद होताना दिसत असून आमदार दळवी यांचा या विकास कामाशी कोणताच संबंध नसून ते मच्छिमारांच्या मागणीनुसार कल्याचे नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी शिंदेंच्या शिलेदाराने घेतलेले श्रेय देखील फेटाळल्याचे समोर आले आहे.
अलिबाग तालुक्यातील आक्षी-साखर येथे ग्रोयान्स बंधारा, जेट्टी पोहच रस्ता आदी कामांसाठी आपण विकास निधी आणल्याचा दिखावा विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांनी केला. याच्याधीही त्यांनी असा दिखावा अनेकवेळा केला आहे. तर या प्रकल्पातंर्गत ग्रोयान्स बंधारा, जेट्टी, पोहच रस्ता, व अस्तित्वातील नौकानयन मार्गातील गाळ काढणे या कामांसाठी निधी मंजूर झाला आहे. तर याचे भूमिपूजन नुकताच पार पडले.
पण आमदार दळवी यांनी या कामासाठी आपणच प्रयत्न केल्याची जाहिरात करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. मंत्री नितेश राणे यांनी हा प्रकल्प मच्छिमारांच्या मागणीनुसार आणले असल्याचे सांगितले. तर भूमीपूजनाच्या कार्यक्रमात मंत्र्यांचे कौतुक करावे, त्यांच्यांवर बोलावे अशी अपेक्षा आमदारांची असावी. पण नितेश राणे यांनी आमदारांचा दावाच खोडून काढत त्यांच्या दाव्याकडे, जाहीरातबाजीकडे अन् बोलण्यावर फारसे लक्ष दिले नाही, हे समोर आले आहे. यामुळे आमदारांचा दिखावा उघड झाल्याची चर्चा पंचक्रोशीत सुरू झाली आहे.
शिंदेंच्या शिवसेनेला दणका
दरम्यान या कार्यक्रमात आक्षी, साखरमधील शिंदेंच्या असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले. यामुळे शिवसेनेला मोठा दणका बसला आहे. तर केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार असून जिल्ह्यातदेखील भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र असल्याचे सांगितले जाते. मात्र आता झालेल्या या पक्ष प्रवेशासह जाहीरातबाजीमुळे महायूतीमधील भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आले आहे.
1. आक्षी-साखर प्रकल्पाचे भूमिपूजन कोणी केले?
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाले.
2. महेंद्र दळवी यांनी काय दावा केला होता?
हा प्रकल्प त्यांच्या मागणीनुसार मंजूर झाल्याचा दावा त्यांनी केला होता.
3. नितेश राणे यांनी काय स्पष्ट केले?
प्रकल्प मच्छिमारांच्या मागणीनुसार मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.
4. या प्रकल्पात कोणती कामे आहेत?
ग्रोयान्स बंधारा, जेट्टी पोहच रस्ता आदी कामांचा समावेश आहे.
5. या वादाचा काय परिणाम होऊ शकतो?
स्थानिक राजकारणात श्रेयवाद वाढून नेत्यांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.