Nitesh Rane ON Love Jihad: शाहरुख खानचे चित्रपट पाहून लव जिहादची प्रकरणं वाढायची! भाजप मंत्र्यांच वादग्रस्त विधान

Nitesh Rane Controversial Statement on Love Jihad : लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे काही उमेदवार जिंकल्यानंतर हिरवे झेंडे फडकण्यात आले. हिरवे गुलाल उधळून घोषणाबाजी केली. मात्र आता जनता त्यांनाही ही संधी पुन्हा देणार नाही
Nitesh Rane News
Nitesh Rane NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुण्यातील धानोरी येथील भैरवनगर परिसरात अखिल भैरवनगर हिंदु संमेलन समितीच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाला भाजप मंत्री नितेश राणे यांनी उपस्थिती लावत उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केले.

नितेश राणे म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले.स्वराज्याची लढाई इस्लामाच्या विरोधात होती. म्हणजे हिंदू विरुद्ध मुस्लिम होती हे सर्वांना माहिती आहे. मात्र काही आपल्यातले दीड शहाणे म्हणतात की महाराजांच्या सैनिकांमध्ये मुस्लिम होते मात्र हे त्यांच्या वडीलांनी पाकिस्तान मधून येऊन त्यांना सांगितलंय का? तसं खरंच असतं तर काही लिखित पुरावे सापडले असते,"

"औरंग्या आणि टिपूने असंख्य हिंदू मंदिरात तोडली. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेब मारत होता तेव्हा त्यांनी त्यांना स्वराज्य मागितले नाही, दौलत मागितले नाही फक्त तुमचा धर्म बदला असं सांगितलं. त्यामुळे हे स्पष्ट होतं की स्वराज्याची लढाई हि केवळ इस्लामच्या विरोधातच होती," असे राणे म्हणाले.

Nitesh Rane News
Sunetra Pawar: सुनेत्रावहिनींनी अर्ज भरण्यापूर्वी एका बॅनरनं वेधलं लक्ष! तटकरे, पटेलांचा एकेरी उल्लेख, 'अजितदादांचे फक्त नावच...'

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे काही उमेदवार जिंकल्यानंतर हिरवे झेंडे फडकण्यात आले. हिरवे गुलाल उधळून घोषणाबाजी केली. मात्र आता जनता त्यांनाही ही संधी पुन्हा देणार नाही. मोदीजींच्या काळात आता गोष्टी बदलल्या आहेत. पूर्वी सातत्याने खान यांचे चित्रपट यायचे. खान यांच्या शिवाय दुसरे चित्रपटात येत नव्हते. मात्र आता,छावा, धुरंदर सारखे चित्रपट येत असून आता रणवीर कपूर देखील रामायण सारखा चित्रपट करत आहे. नाही तर पूर्वी शाहरुख खानचे चित्रपट पाहून लव जिहादच्या केसेस वाढायच्या असं वादग्रस्त विधान नितेश राणे यांनी केलं.

Nitesh Rane News
Pandharpur Crime News: धक्कादायक! भालके गटाच्या नगरसेवकाने 3 जणांवर केला कोयत्याने हल्ला; पंढरपूर हादरलं

"कळस धानोरी हा एअरपोर्ट परिसर असून या भागात एका हिरव्या सापाला ठेवू नका, आपण मंत्री झालो तरी यांना ठेचायची औषध माझ्याकडे आहेत. एक एका बांगलादेशीला बाहेर काढून ठेचावा लागेल," असे वादग्रस्त विधान नितेश राणे यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com