Ambernath News : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून मुंबई एटीएसने केलेल्या तपासातील एन्ट्रीमुळे एकच खळबळ उडाली आहे. येथे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे पासपोर्ट एकाच व्यक्तिकडे सापडले आहेत. या प्रकरणी चांद अली अब्दुल रशीद सैयद (वय ३८) या व्यक्तिला अटक करण्यात आली आहे. तर त्याला मलंगगड परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास हिललाईन पोलीस करत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील मलंगगड परिसरातील चांद अली अब्दुल रशीद सैयद याने २००९ मध्ये भारताचा पासपोर्ट मिळवला होता. ज्यानंतर तो पाकिस्तानात गेला होता. तर तेथेही त्याने वास्तव्य करत भारतीय नागरिकत्व लपवत पाकिस्तानी पासपोर्ट मिळवला. यासाठी त्याने ‘चांद अली रशीद अली’ या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली.
इतकेच काय तर त्याने पाकिस्तानी पासपोर्टच्या आधारे भारतात प्रवेश केला. आणि तो अंबरनाथ परिसरात राहत होता. धक्कादायक म्हणजे भारतात परतल्यानंतर देखील त्याने आपली जुनी माहिती लपवून ठेवली. तर पॅन कार्ड, डोमिसाइल आणि इतर कागदपत्रांच्या आधारे पुन्हा नवीन भारतीय पासपोर्ट काढला.
मात्र प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या पडताळणीत त्याच्या या पराक्रमाचा पर्दाफाश झाला. तसेच याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. ज्यानंतर संबंधित व्यक्तीच्या नागरिकत्वाबाबत आणि कागदपत्रांच्या संशयावरून त्याची सखोल चौकशी करण्यात आली. याच चौकशीतून त्याच्याकडे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे पासपोर्ट असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी आता हिललाईन पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून चांद अली अब्दुल रशीद सैयद याला अटक करण्यात आली आहे. तसेच सध्या पोलिस हे दोन्ही पासपोर्टचा वापर त्याने कशासाठी केला याचा शोध घेत आहेत. तर या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता आता मुंबई एटीएसची याच एन्ट्री झाली आहे.
एटीएसकडून चांद अली अब्दुल रशीद सैयद याचे पाकिस्तानातील संपर्कासह भारतात तो कोणाच्या संपर्कात होता याचा शोध घेतला जात आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधीत देखील तपास केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.