Crime News : धक्कादायक! पोलिसानेच भररस्त्यात कढली महिलेची छेड, पाठलाग करत अश्लील कमेंट...; बहिणीने शूट केला व्हिडिओ

Police officer harasses woman on road: राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याच रायगड जिल्ह्यात संतापजनक घटना घडली असून एका पोलिस आणि त्याच्या सहकाऱ्याने महिलेची भररस्त्यात छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे.
Police officer harassment viral video
Police officer makes obscene comments to womanAI Generated Image
Published on
Updated on

Raigad Police Misconduct : रायगड जिल्ह्यातील पोलिस दलाला कलंक लावणारा संतापजनक प्रकार कर्जतमध्ये घडला आहे. एका पोलिस कर्मचाऱ्याने महिलेची भररस्त्यात छेड काढल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाला असून आधी गुन्हा दाखल करण्यास पोलिस प्रशासनाने टाळाटाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

संतप्त ग्रामस्थांनी मध्यरात्री पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केल्यानंतर आणि ग्रामस्थांच्या तीव्र दबावानंतर मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारामुळे जिल्ह्यासह रायगड पोलिस दलालात खळबळ उडाली आहे. तर गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव प्रमोद पाटील असे आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कर्जतमधील जकात नाका येथील रेल्वे स्टेशनच्या पुलावर १३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९:३० वाजता ही घटना घडली. तक्रारदार महिला आणि तिची बहीण कर्जत बाजारातून गुंडगे येथील आपल्या घरी परत जात होती.

रेल्वे पुलावरून जात असतानाच पोलिस कर्मचारी प्रमोद मारोती पाटील आणि त्याचा साथीदार महेंद्र भगवान भंडारे या दोघांनी मद्यधुंद अवस्थेत त्यांचा पाठलाग केला. तसेच "चल येते का चल" असे म्हणत महिलेची छेड काढत विनयभंग केला.

यावेळी तक्रारदार महिलेच्या बहिणीने सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. तसेच याबाबत दाजींना माहिती दिली. ज्यानंतर महिलेच्या नवऱ्याने घटनास्थळी धाव घेत छेडछाड करणाऱ्यांना जाब विचारला. यावेळी यातील एक व्यक्तही हा पोलिस कर्मचारी असल्याचे समोर आले.

Police officer harassment viral video
Beed Crime News : बोगस कामाच्या बिलावर सही नाकारली; बीडमध्ये इंजिनिअरने ग्रामरोजगार सेवकाला थेट घरात घुसून चोपले

यानंतर पीडित महिला आणि तिच्या नातेवाईकांनी कर्जत पोलिस ठाणे गाठत तक्रार घेण्याची मागणी केली. पण आरोपी हा पोलिस दलातीलच असल्याने सुरुवातीला कर्जत पोलिसांनी टाळाटाळ केली.

ज्यानंतर २० ते ३० गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या करत कारवाईसाठी पोलिसांवर दबाव आणला. अखेर ग्रामस्थांचा आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री ३ वाजता गुन्हा दाखल केला.

Police officer harassment viral video
Crime News : काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार, पोलिसांनी 7 जणांना ठोकल्या बेड्या; 46 गुन्हे दाखल असलेला निघाला मास्टरमाईंड

दरम्यान तक्रारदार महिलेच्या बहिणीने मोबाईलमध्ये शूट केलेला व्हिडिओ डिलीट करण्यासाठी दबाव पोलिस कर्मचाऱ्याने आणल्याचेही आता समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com