Amit Shah Sarkarnama
कोकण

Raigad : अमित शहांसाठी तटकरे आखणार फक्कड बेत; 'कोकणचा मेवा' खायला देऊन खुशच करणार!

Amit Shah in raigad : गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी (ता.12) ते रायगडच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी शाह यांना जेवणासाठी आमंत्रित केले आहे.

Hrishikesh Nalagune

Amit Shah in raigad : गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी (ता.12) ते रायगडच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी शाह यांना जेवणासाठी आमंत्रित केले आहे. हे आमंत्रण त्यांनी स्वीकारले असून ते दुपारी दोनच्या सुमारास तटकरे यांच्या रोह्यातील निवासस्थानी स्नेहभोजन करणार आहेत.

या स्नेहभोजनात शाहंसाठी तटकरे फक्कड कोकणी बेत आखणार आहेत. शाह हे शाकाहारी असल्याने ते मासे खाणार नाहीत. पण त्यांच्यासाठी हापूस आंब्याचा सिझन असल्याने आमरस-पुरीचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय मिसळपाव, मोदक आणि साबुदाणा वड्याचा पाहुणचार असणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि अन्य मंत्र्यांसाठी खास माश्यांचा आणि मटणाचा पाहुणचार असणार आहे. जेवण झाल्यानंतर सोल कढीही असणार आहे.

रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार?

रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिवसेना आणि राष्ट्रवादीचाही दावा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती दिली आहे. मात्र यावर अजून तोडगा निघालेला नाही. त्याचवेळी अमित शाह रायगड दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यावर पालकमंत्रीपदाचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. तटकरेंच्या रोह्यातील निवास्थानाचे भोजन यासाठी महत्वाचे मानले जात आहे.

असा असेल अमित शाहांचा दौरा

मिळालेल्या माहितीनुसार, आज (शुक्रवारी) रात्री गृहमंत्री अमित शाह हे पुण्यात मुक्कामी येतील. शनिवारी सकाळी ते रायगड किल्ल्याकडे रवाना होतील. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचड गावामध्ये राजमाता जिजाऊंच्या समाधीचे ते दर्शन घेतली. त्यानंतर रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतली. तटकरे यांच्या घरी स्नेहभोजन झाल्यानंतर ते मुंबईकडे रवाना होतील. तेथे एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT