BJP Maharashtra : आगामी मोहिमेसाठी भाजपची फौज तयार; प्रत्येक 7 मतदारांमागे उभा केला एक सदस्य!

BJP News : भारतीय जनता पक्षाने नुकताच महाराष्ट्रातील सदस्य नोंदणीचा दीड कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे. महाराष्ट्रात सदस्यसंख्येचा असा विशाल आकडा आतापर्यंत कोणत्याही पक्षाला गाठता आला नव्हता
BJP Maharashtra
BJP MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

BJP News : भारतीय जनता पक्षाने नुकताच महाराष्ट्रातील सदस्य नोंदणीचा दीड कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे. महाराष्ट्रात सदस्यसंख्येचा असा विशाल आकडा आतापर्यंत कोणत्याही पक्षाला गाठता आला नव्हता, त्यामुळे ही भाजपची ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. इतकेच नाही तर भाजपला लोकसभेमध्ये मिळालेल्या मतांपेक्षा जास्त सदस्यांची नोंदणी झाली आहे. भाजपला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत 1 कोटी 49 लाख 66 हजार 577 मते मिळाली होती. तर आता दीड कोटी सदस्य संख्या पूर्ण झाली आहे.

ही ऐतिहासिक कामगिरी करतानाच भाजपने आगामी निवडणुकांसाठी अगदी बारकाईने प्लॅनिंग केल्याचे दिसून येते. भाजपने महाराष्ट्रातील आता प्रत्येक 7 मतदारांमागे एक सदस्य उभा केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 9.59 कोटी नोंदणीकृत मतदार आहेत. यात पुरुष मतदारांची संख्या 4.59 कोटी आणि महिला मतदारांची संख्या 4.64 कोटी आहे. तृतीयपंथीय मतदारांची संख्या 6 हजार आहे.

BJP Maharashtra
Karmala Politic's : संजय शिंदे अजितदादांना भेटायला गेल्यावर नेमकं काय घडलं?; आमदार नारायण पाटलांचा खळबळजनक आरोप

आता भाजपचे दीड कोटी सदस्य पूर्ण झाले आहेत. म्हणजे प्रत्येक 7 मतदारांमागे भाजपचा एक सदस्य असणार आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर तुम्ही आठ जण एकत्र उभे असाल तर त्यातील एक जण भाजपचा सदस्य असणार आहे. या सदस्याचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर अशा सगळ्या गोष्टी पक्षाकडे आहेत. निवडणूक काळात या सदस्याला धोरणे, प्रचाराचे मुद्दे, नेत्यांची भाषणे अशा गोष्टी पोहोचवल्या जाणार आहेत.

भाजपने सुरु केली स्वबळाची तयारी :

भाजप हा 'जगातला सर्वांत मोठी सदस्य संख्या असलेला पक्ष म्हणवून घेत असतो. चीनच्या कम्युनिस्ट पक्षापेक्षाही ही सदस्य संख्या जास्त असल्याचा दावा पक्षातर्फे केला जातो आहे. महाराष्ट्रात यंदा लोकसभेत कामगिरी असमाधानकारक झाली तरी मागील निवडणुकीतील मतदानापेक्षा 775 मते जास्त मिळाली होती. विधानसभेत मात्र भरभरून यश मिळालेच शिवाय एक कोटी 72 लाख 93 हजार 650 मते झोळीत पडली.

BJP Maharashtra
Raju Patil News: ठाण्याची 'रिक्षा’ भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात! मनसे माजी आमदारानं व्हिडिओ शेअर करीत एकनाथ शिंदेंचं लक्ष वेधलं!

मात्र या मतांमध्ये शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या मतांचाही वाटा होता. त्यामुळे स्वत:ची ताकद वाढविण्यावर भाजपने भर दिला. आधी राज्यात एक कोटी सदस्य संख्या करण्याचे उद्दिष्ट दिले होते. हे उद्दिष्ट टप्प्यात दिसताच भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी 50 लाखांनी वाढवून दीड कोटींवर नेले. आता हेही टार्गेट पूर्ण झाले आहे. नागरिकांना मिस कॉल देणे किंवा ऑनलाइन नोंदणी करून पक्ष सदस्यत्व घ्यायचे होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com