Sharad Pawar and Sunil Tatkare Sarkarnama
कोकण

Raigad Politics : शरद पवारांची पॉवरफुल खेळी; सुनील तटकरेंच्या विरोधात भावाला ताकद देत दिली मोठी जबाबदारी

Sharad Pawar and Sunil Tatkare : खासदार सुनील तटकरे यांचे भाऊ अनिल तटकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 'महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष'पदाची जबाबदारी सोपवली.

Ganesh Thombare

Raigad News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ दिली. त्यामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. आता खासदार सुनील तटकरेंच्या विरोधात शरद पवारांनी पॉवरफुल खेळी करत सुनील तटकरेंचे भाऊ अनिल तटकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची रायगडमधून उमेदवारी निश्चित मानली जात आहे, तर सुनील तटकरे यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून अनिल तटकरे यांना मोठी ताकद देण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रायगडचं राजकारण तापण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते पत्र देत अनिल दत्तात्रय तटकरे यांची पक्षाच्या 'महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष'पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या वेळी राजेश टोपे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, तटकरे कुटुंबीयांमध्ये 2019 मध्ये काही मतभेद झाले होते, पण शरद पवार यांच्या मध्यस्थीमुळे त्यांच्यातील वाद मिटला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ दिली, तर अनिल तटकरे यांनी शरद पवारांची साथ दिली. आता अनिल तटकरेंना पक्षात मोठी जबाबदारी देण्यात आल्यामुळे आगामी काळात सुनील तटकरे आणि अनिल तटकरे यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT