Zeeshan Siddique News : वडील राष्ट्रवादीत जाताच झिशान यांची हकालपट्टी; काँग्रेसकडून मोठा निर्णय

Youth Congress News : झिशान सिद्दिकी हे काँग्रेसचे आमदार असून, त्यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Zeeshan Siddique
Zeeshan SiddiqueSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर काही दिवसांतच काँग्रेसने त्यांचे आमदार पुत्र झिशान यांनाही झटका दिला. झिशान यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. (Zeeshan Siddique News)

झिशान (Zeeshan Siddique) हे मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांचे वडील बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर झिशान यांच्याही राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा होती. मात्र, त्यांनी काँग्रेसमध्ये थांबणार असल्याचे त्यावेळी स्पष्ट केले. असे असले तरी काँग्रेसवर टीका केली होती.

Zeeshan Siddique
Thackeray Group : ठाकरे गट अन् काँग्रेसमधील दोन मोठे नेते भाजपच्या मार्गावर ? बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

झिशान हेही काँग्रेसमधून (Congress) बाहेर पडू शकतात, अशी जोरदार चर्चा अजूनही राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे पक्षाने त्यांच्याकडून युवक काँग्रेसचे अध्यक्षपद काढून घेतल्याची चर्चा आहे. झिशान यांच्या जागी अखिलेश यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सुफियान मोहसीन हैदर या कार्यकारी अध्यक्ष असतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)  

भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी मुंबईसह काही राज्यांतील अध्यक्षांची नव्याने नियुक्ती केली आहे. दरम्यान, झिशान यांनी वडिलांच्या राष्ट्रवादीत प्रवेशापूर्वी काँग्रेसवर सडकून टीका केली होती. कोरोनासह इतर अडचणींच्या काळात पक्षाने मदत केली नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. झिशान यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

झिशान म्हणाले होते की, मी सध्या तरी काँग्रेसमध्ये आहे. भविष्यातील राजकीय स्थिती काय असेल, याबाबत आताच काही सांगता येत नाही. मात्र, सरकार असतानाही महाविकास आघाडीत माझ्यावर झालेला अन्याय जगजाहीर आहे. तरुण आमदार असल्याने मदतीची अपेक्षा होती. मात्र, कुणीही अडचणीत मदत केली नाही. मला खटकणाऱ्या गोष्टींबाबत वारंवार जाहीरपणे बोललो, मात्र त्याचीही कुणी दखल घेतली नाही, असा आरोप झिशान यांनी केला होता.

R

Zeeshan Siddique
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा टक्का कसा घसरला? फडणवीसांनी दिलं 'हे' उत्तर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com