Nitesh Rane 

 

Sarkarnama

कोकण

नितेश राणेंच्या जामिनावर निर्णय नाहीच; कधीही होऊ शकते अटक

शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी उद्यापर्यंत (ता.30) पुढे ढकलली आहे. राणेंना न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नसल्याने त्यांना कधीही अटक होऊ शकते.

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. राणे आणि सरकारी पक्षाच्या वतीने यावर आज युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने आता ही सुनावणी उद्यावर ढकलली आहे. राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या न्यायालयात फैसला होणार आहे. यामुळे नितेश राणेंवरील अटकेची टांगती तलवार कायम आहे.

नितेश राणे यांच्या वतीने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. यावर काल (ता.28) न्यायालयात साडेतीन तास सुनावणी झाली. न्यायालयाकडून त्यांना तातडीने कोणताही दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्याने तो वाढवून देण्याची मागणी त्यांच्या वकिलांनी केली. परंतु, न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेतली.

न्यायालय राणेंच्या जामिनावर कोणता निर्णय यावर ते अटक होणार की नाही हे स्पष्ट होईल. मात्र, पोलीस दलाने आधीपासूनच पूर्ण तयारी केली आहे. कणकवली पोलीस ठाण्यात हालचालींना वेग आला आहे. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. राणेंचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यास पोलीस तातडीने अटक करण्याच्या हालचाली करतील, असे चित्र आहे.

प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या नॉट रिचेबल आहेत. त्यांचा मोबाईल दोन दिवसांपासून नॉट रिचेबल येत आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात अटक होण्याच्या शक्यतेने ते गायब झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरु असून पोलिसांची पथके गोव्यातही त्यांच्या शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT