पोलिसांनी थेट केंद्रीय मंत्री राणेंच्या घरावरच नोटीस चिकटवली अन् काही वेळातच...

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
Narayan Rane 

Narayan Rane 

Sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जिल्हा सत्र न्यायालयात आज त्यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली आहे. ही नोटीस त्यांच्या घरावर चिकटवण्यात आली होती. परंतु, राणेंच्या कर्मचाऱ्यांनी काही वेळातच ही नोटीस काढून टाकली आहे.

नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना नितेश यांच्या ठावठिकाण्याबद्दल वक्तव्य केले होते. नितेश हे गायब असून, ते कुठे आहेत या प्रश्नावर राणे यांनी वक्तव्य केले होते. नितेश राणे कुठे आहेत, हे मला माहिती असले तरी मी सांगणार नाही. मला माहिती असले तरी मी ते तुम्हाला का सांगू, असे विधान नारायण राणेंनी केले होते. राणेंना त्यांचे पुत्र कुठे आहेत, हे माहिती असूनही ते सांगत नाहीत, असा अर्थ पोलिसांनी काढला आहे. त्यामुळे त्यांना आज दुपारी 3 वाजता पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी बजावली होती. यामुळे राणे आता अडचणीत आल्याचे दिसत आहे.

राणे यांनी पोलिसांच्या नोटिशीला उत्तर देणार नाही, असे म्हटले आहे. राणे यांना त्यांच्या मुलाचा ठावठिकाणा माहिती असून, त्यांनी तो कणकवली पोलीस ठाण्यात हजर राहून तो सांगावा, असे नोटिशीत म्हटले आहे. राणेंनी नोटिशीली उत्तर न देण्याची भूमिका घेतल्याने पुन्हा एकदा ते पोलिसांच्या कचाट्यात अडकू शकतात, असे मानले जात आहे. पोलिसांनी ही नोटीस राणेंच्या घरावरही चिकटवली होती परंतु, नंतर ती राणेंच्या कर्मचाऱ्यांनी काढून टाकली आहे.

नितेश राणे यांच्या वतीने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. यावर काल (ता.28) न्यायालयात साडेतीन तास सुनावणी झाली. न्यायालयाकडून त्यांना तातडीने कोणताही दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्याने तो वाढवून देण्याची मागणी त्यांच्या वकिलांनी केली. परंतु, न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेतली आहे. आता ही सुनावणी सुरू आहे.

<div class="paragraphs"><p>Narayan Rane&nbsp;</p></div>
न्यायालयाचा आदेश मिळण्याआधीच नितेश राणेंसाठी पोलिसांची फिल्डींग

न्यायालय राणेंच्या जामिनावर कोणता निर्णय यावर ते अटक होणार की नाही हे स्पष्ट होईल. मात्र, पोलीस दलाने आधीपासूनच पूर्ण तयारी केली आहे. कणकवली पोलीस ठाण्यात हालचालींना वेग आला आहे. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पोलीस ठाण्यात सुरू आहे. राणेंचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यास पोलीस तातडीने अटक करण्याच्या हालचाली करतील, असे चित्र आहे.

<div class="paragraphs"><p>Narayan Rane&nbsp;</p></div>
नितेश राहिले बाजूला आता नारायण राणेच आले अडचणीत!

प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या नॉट रिचेबल आहेत. कालपासून त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल येत आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात अटक होण्याच्या शक्यतेने ते गायब झाल्याची चर्चा सध्या सुरु आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरु असून पोलिसांची पथके गोव्यातही त्यांच्या शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com