APMC Election Palghar : पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा रोवला गेला. 17 पैकी 17 जागा जिंकत महाविकास आघाडीने पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व प्राप्त केले आहे.
पालघर बाजार समितीवर शिवसेना शिंदे गटाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही.काल (शुक्रवारी) झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १५ जागा महाविकास आघाडीच्या बिनविरोध निवडून आल्या होत्या; तर व्यापारी गटाच्या दोन जागांसाठी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
या निवडणुकीत दोन्ही उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून आल्याने एकूण सदस्य संख्या १७ झाली. पालघर बाजार समितीवर शिवसेना शिंदे गटाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही.
बुलढाणा येथे आश्चर्यकारक निकाल
बुलढाणा जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समिती अंतिम निकाल लागला आहे. पाच पैकी तीन बाजार समित्यावर महाविकास आघाडीने झेंडा फडकला आहे.
जिल्ह्यात खामगाव व बुलढाणा बाजार समितीत आश्चर्यकारक निकाल लागले आहेत. खामगाव येथे विद्यमान भाजपा आमदार आकाश फुंडकर यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपला याठिकाणी फक्त दोन जागा मिळाल्या आहेत.
संजय गायकवाडांना धक्का
बुलढाणा बाजार समितीत विद्यमान शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना नवख्या असलेल्या ठाकरे गटाचे जालिंदर बुधवत यांनी धोबीपछाड दिली आहे.संजय गायकवाड यांनी याठिकाणी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती मात्र त्यांना मोठा धक्का बसला आहे.
खेडमध्ये मोहितेंनी बाजी मारली
पुणे जिल्ह्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. या ठिकाणी राष्ट्रवादी काँगेस विरुद्ध सर्व पक्षीय अशी लढत झाली. यात राष्ट्रवादी काँगेस पक्षाने बाजी मारली आहे. राष्ट्रवादीला या निवडणुकीत 10, ठाकरे गटाला 3, भाजपला 2, काँग्रेसला 1 जागेवर यश मिळालं आहे. तसेच व्यापारी मतदारसंघातील 2 अपक्ष उमेदवारही विजयी झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.