APMC Election : खेड बाजार समितीवर दिलीप मोहिते यांचीच बाजी ; राष्ट्रवादीला १० जागा..

NCP Dilip Mohite Market Committee Election : राष्ट्रवादीला या निवडणुकीत 10 जागा मिळाल्या आहेत.
Mohite Market Committee Election
Mohite Market Committee ElectionSarkarnama

NCP Dilip Mohite Market Committee Election : पुणे जिल्ह्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काल (शुक्रवार) तब्बल ९९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण ३८९६ मतदारांपैकी ३८३९ मतदारांनी मतदान केले.

या ठिकाणी राष्ट्रवादी काँगेस विरुद्ध सर्व पक्षीय अशी लढत झाली. यात राष्ट्रवादी काँगेस पक्षाने बाजी मारली आहे. राष्ट्रवादीला या निवडणुकीत 10, ठाकरे गटाला 3, भाजपला 2, काँग्रेसला 1 जागेवर यश मिळालं आहे. तसेच व्यापारी मतदारसंघातील 2 अपक्ष उमेदवारही विजयी झाले आहेत.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. पण त्यांचा या निवडणुकीत विजय झाला. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी तालुक्यातील ७ ठिकाणी १७ मतदान केंद्रावर उत्साहात मतदान झाले. बाजार समितीची निवडणूक अतिशय चुरशीची झाल्याने मतदानाची टक्केवारी वाढली. तब्बल ९८.५४ टक्के मतदान झाले.

Mohite Market Committee Election
Rahul Gandhi यांना बाँम्बनं उडवून देण्याची धमकी देणाऱ्या साठ वर्षीय व्यक्तीला मध्यप्रदेशातून अटक..

सकाळासूनच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी झाली होती. तालुक्यातील राजगुरुनगर,चाकण, वाडा, शेलपिंपळगाव, कनेरसर, पाईट आणि आंबोली अशी सात मतदान केंद्रे होती. राजगुरुनगर येथे कृषी पतसंस्था व ग्रामपंचायत मतदारसंघांबरोबरच आडते व्यापारी व हमाल तोलारी मतदारसंघातीलही मतदान होते. त्यामुळे बहुतेक उमेदवार राजगुरुनगर येथील मतदान केंद्राबाहेर थांबले होते.

Mohite Market Committee Election
Mumbai University : सिनेट निवडणूक कधी ? ; वातावरण तापलं, ठाकरे गटाचे पदाधिकारी कुलगुरुंच्या भेटीला..

तर काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांच्या रणनीतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना यांच्या संघर्ष परिवर्तन पॅनेलचा व्हाइट वॉश करत भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर (Bhor Market Committee Election) कॉंग्रेसचा झेंडा फडकला आहे.

सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाच्या राजगड कृषी विकास पॅनेलचे सर्वच्या सर्व १८ उमेदवार विजयी झाले. चार उमेदवार बिनविरोध निवडून आले तर मतदानानंतर १४ उमेदवार विजयी झाले आहेत.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com