Prasad Sawant
Prasad Sawant Sarkarnama
कोकण

प्रसाद सावंतांना मिळाले निष्ठेचे फळ : ठाकरेंनी सोपवली माथेरानची जबाबदारी!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतरही माथेरानचे माजी नगरसेवक प्रसाद सावंत हे शिवसेनेशी (Shivsena) अर्थात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) एकनिष्ठ राहिले होते. त्या निष्ठेचे फळ सावंत यांना मिळाले असून माथेरान शिवसेना शहरप्रमुखपदाची जबाबदारी सावंत यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सावंत यांना मारहाण झाली होती. ती बंडखोर आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्या कार्यकर्त्यांकडून झाल्याचा दावा सावंत यांनी केला होता. (Appointment of Prasad Sawant as Matheran Shiv Sena city chief)

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील शिवसेनेत मोठी पडझड होताना दिसत आहे. शिंदे मुख्यमंत्री बनल्यामुळे सत्तेच्या लोभामुळे अनेकांचा लोंढा सध्या त्यांच्याकडे जाताना दिसत आहे. मात्र, काहीजण आजही शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत, त्यांची निष्ठा मातोश्रीच्या चरणी कायम आहे. यामध्येच माथेरानचे माजी नगरसेवक प्रसाद सावंत यांचा समावेश आहे. त्या एकनिष्ठेनेचे फळ उद्धव ठाकरे यांनी सावंत यांना दिले असून त्यांची माथेरान शिवसेना शहर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रसाद सावंत यांना काही दिवसांपूर्वी मारहाण झाली होती. ही मारहाण बंडखोर आमदार महेंद्र थोरवे यांच्या माणसांनी केल्याचं म्हटलं जातं होतं. त्या मारहाणीनंतर दवाखान्यात दाखल करण्यात आलेल्या सावंत यांची युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. मुळात सावंतांची ओळख ही कट्टर ठाकरे समर्थक अशीच आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ प्रसाद सावंत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यानंतर सुमारे १५ ते १६ जणांकडून त्यांना मारहाण करण्यात आली होती. त्या हल्ल्यात सावंत गंभीर जखमी झाले होते. तसेच, त्यांच्या गाडीचेही मोठे नुकसान झाले होते. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दवाखान्यात जाऊन सावंत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT