Ashok Kharat case; Sunil Tatkare sarkarnama
कोकण

Ashok Kharat case : जखम छोटी, वाद मोठा! बोटाच्या जखमेवरून राजकारण तापलं; तटकरे म्हणाले...

Sunil Tatkare clarifies finger injury details: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या बोटाला जखम झाल्याचे फोटो समोर आले होते. त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं होते.

Aslam Shanedivan

  1. अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

  2. रुपाली चाकणकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर वाद अधिक तीव्र झाला.

  3. सुनील तटकरे यांनी व्हायरल फोटोतील जखमेबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

Raigad/Mumbai News : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात वादळ आणले असून चाकणकरांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या बोटाला जखम झाल्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. ज्यानंतर अशी जखम ही 'अघोरी पूजा' किंवा अंधश्रद्धेशी संबंधित असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विलास लवांडे यांनी तटकरेंच्या अंगठ्याच्या जखमेवरून राष्ट्रवादीला डिवचले होते. ज्यानंतर राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी सडेतोड उत्तर दिले होते. यानंतर आता खुद्द तटकरे यांनी बोटाला नेमकी जखम कशी झाली? याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी, माझ्या बोटाला जखम झाली होती असे सांगत माझी श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही, असे म्हटले आहे.

सध्या महाराष्ट्रात अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि भाविकांची आर्थिक लूट सुरू असणाऱ्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचेही असेच प्रकरण उघडकीस आले असून याची आता राज्यभर चर्चा होताना दिसत आहे. खरातचे एकामागून एक काळे कारनामे विशेष तपास पथकाच्या तपासात उघड होत असतानाच अनेक मंत्री, राजकीय नेत्यांसह प्रशासकीय अधिकारीही खरातच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान तटकरे यांच्या हाताला झालेल्या जखमेचा संबंध खरातशी लावला जात आहे. यावर राज्यात वादंग उठल्यानंतर आता तटकरे यांनी मौन सोडले आहे.

त्यांनी बोटाच्या जखमेवरून उलट-सुलट सुरू असेलल्या चर्चांवर नुकताच पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. या जखमेचा संबंध नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणाशी जोडले जात आहे. या जखमेचा चुकीचा अर्थ काढला जात असेल तर हे दुर्दैवी असल्याचे म्हणत त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच बोटाला नेमकी जखम कशी झाली? याबाबत स्पष्टीकरण देताना संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या दोन दिवस आधी अलिबाग येथे माजी आमदार मधूशेठ ठाकूर यांच्या समाधी दर्शनासाठी त्यांच्या गावात गेलो होतो. त्यावेळी जिल्ह्यातील नामांकित वकील ॲड. प्रवीण ठाकूर भेटीसाठी आले होते. दर्शन घेऊन मी गाडीत बसत असताना प्रवीण ठाकूर यांनी गाडीचा दरवाजा लावला आणि त्याचवेळी अंगठ्याला मोठी जखम झाली.

ज्यानंतर तातडीने जवळच्या रुग्णालयात जावून रुग्णालयात उपचार घेतले. तर अंगठ्याला ५ स्टेप्लर टाके पडल्याचेही तटकरे यांनी म्हटले आहे. तसेच मी पुन्हा, पुन्हा खुलासा करणार नाही की मी 40 वर्षांपासून राजकारणात आहे. 2019 साली मी महाविकास आघाडीमध्ये निवडून आलो. 2024 ला महायुतीकडून निवडून आलो. हीच माझी विश्वासार्हता असल्याचेही तटकरेंनी म्हटले आहे.

तर या घटनेनंतर आपण दिल्लीला गेलो, त्यावेळीही अंगठ्याला जखम होती. याचा अर्थ कोण कुठे लावणार असले तर ते दुर्देवी आहे. यापेक्षा पुढे काय बोलणार. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एआयटी स्थापन केली आहे. IPS सातपुते या एआयटीच्या प्रमुख आहेत. मुख्यमंत्र्यांनी सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. तर एक खासदार म्हणून माझीही हीच मागणी आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावे. तर माझी श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही, असेही त्यांनी नमुद केले आहे.

FAQs :

1. अशोक खरात प्रकरणामुळे काय घडले?
राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

2. रुपाली चाकणकर यांनी राजीनामा का दिला?
खरात प्रकरणाशी संबंधित कथित संबंधांमुळे.

3. सुनील तटकरे यांच्याबाबत काय वाद आहे?
त्यांच्या जखमेच्या फोटोवरून अघोरी पूजेचा आरोप करण्यात आला.

4. तटकरे यांनी काय स्पष्टीकरण दिले?
जखम कशी झाली याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

5. पुढे काय होऊ शकते?
या प्रकरणात आणखी राजकीय आणि तपासातील घडामोडी होऊ शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT