Ratnagiri Municipal Elections; Bacchu Kadu  sarkarnama
कोकण

Bacchu Kadu : बच्चू कडूंची विदर्भातून थेट कोकणाच्या राजकारणात एन्ट्री, प्रहारची स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर मोठी घोषणा

Ratnagiri Municipal Elections : होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून कोकणातही राजकारण आता चांगलच तापलं आहे. येथे 4 नगर परिषदा आणि 3 नगर पंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.

Aslam Shanedivan

  1. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी रत्नागिरीतील नगरपरिषदेच्या निवडणुकीत पक्ष उतरवण्याची घोषणा केली आहे.

  2. बच्चू कडू यांनी सांगितले की, प्रहार पक्ष या निवडणुकीत 5 ते 6 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे.

  3. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आता महायुती आणि आघाडीसोबत प्रहार पक्षाचं तिसरं आव्हान उभं राहणार आहे.

Ratnagiri News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. कोकणातील रत्नागिरीतही 4 नगर परिषदा आणि 3 नगर पंचायतींच्या रण तापणार असून निवडणुकांच्या या पार्श्वभूमीवर सर्व प्रमुख राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.एकीकडे येथे महाविकास आघाडी आणि महायुतीतील मित्र पक्षांमध्ये अद्याप जागा वाटपाचा फार्म्युला ठारलेला नाही किंवा युती-आघाडीही झालेली नाही. उलट येथे महायुतीतील भाजप आणि शिवसेनेत धुसफूस होताना दिसत आहे.

अशा या राजकीय वातावरण तापलेल्या जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाने प्रवेश केला आहे. याबाबत प्रहारचे अध्यक्ष तथा माजी मंत्री माजी आमदार बच्चू कडू यांनी माहिती दिली असून त्यांनी रत्नागिरीतील नगरपरिषदेची निवडणुकीत आपला पक्ष उतरणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी, आपला पक्ष नगरपरिषदेची निवडणुकीत उतरणार असून 5 ते 6 जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचे म्हटलं आहे.

बच्चू कडू यांच्या या निर्णयामुळे रत्नागिरीच्या राजकारणात नवे राजकीय समिकरण तयार होणार असून महायुतीतीची डोकेदुखी वाढणार आहे. तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमोर नवे आव्हान उभे राहणार आहे. आतापर्यंत कोकणातील राजकारण शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसपुरतेच मर्यादीत होते. पण आता येथे प्रहार या पक्षाची एन्ट्री होणार आहे. यामुळे नव्या राजकीय खेळीची शक्यता निर्माण झाली आहे.

तसेच कडू यांनी यावेळी, आपल्या पक्षाचा निर्णय सांगताना, रत्नागिरीसह कोकणातील मतदारांनी प्रहारच्या कामाचा आणि भूमिकेचा नक्की विचार करावा. प्रहार नेहमीच सर्वसामान्यांसाठी लढणारा पक्ष असल्याचेही कडू यांनी म्हटलं आहे. याचवेळी कडू यांनी निवडणूक प्रक्रियेवर देखील गंभीर आरोप केले असून त्यांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर देखील शंका उपस्थित केली आहे.

त्यांनी, मतदान करताना आपण कोणाला करतो, ते कुठे जाते हे जाणण्याचा अधिकार मतदाराला संविधानाने दिला आहे. पण प्रत्यक्षात निवडणूक आयोगाकडूनच हा अधिकार नाकारला जात आहे. त्यामुळे लोकांचा विश्वास टिकवायचं असेल तर निवडणूक आयोगाने पारदर्शकता राखली पाहिजे.

तर ईव्हीएममधूनच भ्रष्टाचार सुरू असल्याचाही दावा कडू यांनी केला आहे. निवडणूक आयुक्तांना नोटांच्या गड्ड्या मिळाल्या असतील त्यामुळेच राज्यात हा गोंधळ सुरू असल्याचा आरोप देखील कडू यांनी केला आहे.

पण आतापर्यंत येथे दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादींसह काँग्रेसचे प्राबल्य होते. याच पक्षांमध्ये स्थानिकपासून लोकसभेपर्यंत लढत होती. पण आता प्रहार संघटनेच्या जिल्ह्यातील प्रवेशामुळे समीकरणे बदलणार आहेत. मात्र या बदलणाऱ्या समिकरणांना, प्रहारला येथील मतदार किती प्रतिसाद देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

FAQs :

1. बच्चू कडू यांनी कोणती घोषणा केली आहे?
बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्ष रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा केली आहे.

2. प्रहार पक्ष किती जागांवर उमेदवार उभे करणार आहे?
प्रहार पक्ष 5 ते 6 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.

3. रत्नागिरीतील कोणत्या निवडणुका होणार आहेत?
रत्नागिरी जिल्ह्यात 4 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.

4. प्रहार पक्षाचा उद्देश काय आहे?
स्थानिक पातळीवर जनतेच्या मुद्द्यांवर काम करत स्वतःचा राजकीय पाया मजबूत करणे हा उद्देश आहे.

5. या निवडणुकीत प्रहार पक्ष कोणासमोर स्पर्धा करणार आहे?
महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांशी प्रहार पक्ष थेट स्पर्धेत उतरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT