बदलापूर नगरपालिकेत 6 टक्के लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.
अकाऊंटन्ट विकास चव्हाण विरोधात ठाणे ACB ने गुन्हा दाखल केला.
या प्रकरणात आणखी काही अधिकारी अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Badlapur Municipal Corporation News : बदलापूर नगर पालिकेतील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई केली आहे. तर एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे नगर पालिकेतील अनेकांचे दाबे दणाणले आहेत. तर या कारवाईनंतर आता काही अधिकाऱ्यांचा पर्दाफाश होण्याची शक्यता असून तेही अडकण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी नगर परिषदेतील कंत्राटदारांकडे बिले देण्यासाठी टक्केवारीची मागणी केली जात होती. या बाबत आरोपही केले जात होते. तर याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. यानंतर येथे प्रशासनाने एका अधिकाऱ्याला घरचा रस्ता दाखवण्यात आला होता.
दरम्यान, बदलापूर नगरपरिषदेच्या एकूण 77 विकासकामांचे कंत्राट एका कंत्राटदाराला मिळाले असून कामेही जोरात सुरु आहेत. आता याच कामावरून लाच मागितल्या प्रकरणी अकाऊंटन्टची (लेखाधिकारी विकास चव्हाण) विकेट पडली आहे. नगरपालिकेच्या अकाऊंटन्ट विभागाने कंत्राटदाराने केलेल्या कामाची सुरक्षा अनामत रक्कम 4 लाख 99 हजार रुपये आणि दोन देयकांची 17 लाख 44 हजार रुपये अशी 22 लाख 43 हजार रुपयांची रक्कम कंत्राटदाराच्या खात्यात जमा केली होती.
ज्यानंतर या रक्कमेच्य मोबदल्यात 6 टक्के लाचेची मागणी लेखाधिकारी विकास चव्हाण याने केली होती. ज्यानंतर याबाबत कंत्राटदार यांनी 9 डिसेंबर 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यांनी, लेखाधिकारी विकास चव्हाण यांनी 22 लाख 43 हजार रुपयांच्या बदल्यात आपल्याकडे 1 लाख 34 हजार 500 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या तक्रारीच्या अनुशंगाने ACB ने तक्रारीची तातडीनं पडताळणी करत विकास चव्हाण यांनी कामाचा मोबदला म्हणून 6 टक्के रक्कमेची मागणी केल्याचे समोर आले आहे. तर याप्रकरणी आता विकास चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यानंतर आता बदलापूर नगरपरिषदेत खळबळ उडाली आहे. तर अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
1. बदलापूरमध्ये कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार उघड झाला
रस्ते कामाच्या बिलासाठी 6 टक्के लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे
2. या प्रकरणात कोणावर गुन्हा दाखल झाला आहे
अकाऊंटन्ट विकास चव्हाण यांच्यावर ACB ने गुन्हा दाखल केला आहे
3. ही कारवाई कोणी केली आहे
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे
4. लाच कोणत्या कारणासाठी मागितली जात होती
रस्ते कामाचे बिल आणि सुरक्षा ठेव मोकळी करण्यासाठी लाच मागितली जात होती
5. या प्रकरणात आणखी कोण अडकू शकतात
तपास सुरू असून आणखी काही अधिकारी या प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.