Devendra Fadnavis Reacts To Bal Mane BJP Entry; Uddhav Thackeray sarkarnama
कोकण

Devendra Fadnavis : ठाकरेंनी हकालपट्टी केलेल्या 'बाळ मानें'ना भाजपच्या पायघड्या? बड्या नेत्यानंतर प्रवेशावर फडणवीसांचेही सूचक वक्तव्य

Devendra Fadnavis Reacts To Bal Mane Political Move After Konkan MLC Election Twist : विधान परिषद निवडणुकीत बाळ माने यांनी उमेदावरी माघारी घेतल्याने कोकणात मोठा राजकीय भूकंप झाला ज्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या भवितव्यावरच आता आले आहे.

Aslam Shanedivan

Konkan Political News : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप झाला ज्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या भवितव्यावरच आता आले आहे. तर उरली सुरली शिवसेना देखील संपूष्ठात आल्याची चर्चा रंगली आहे. विधान परिषद निवडणुकीत बाळ माने यांनी महाविकास आघाडीने दिलेली अधिकृत उमेदवारीच मागे घेत ठाकरेंसह मविआला धक्का दिला. ज्यानंतर त्यांची पक्षातून उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केली. यानंतर आता ते लवकरच भाजप प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या आहेत. यावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. त्यांनी बाळ माने आम्हाला परके नाहीत असे म्हणत एकतर्फे त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केला आहे.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत कोकणात चांगलीच स्पर्धा पाहायला मिळाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुलगा अनिकेत तटकरे यांच्याविरोधात असलेले शिवसेनेचं बंड मोडीत काढले. पण ठाकरेंच्या शिवसेनेचे आव्हान कायम होते. यामुळे येथे चांगलीच लढत होईल अशी स्थिती निर्माण झाली होती.

मात्र बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज अचानक मागे घेतला. तसेच त्यांनी यावर स्पष्टीकरणही दिले. मात्र भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे यांच्या सोबत त्यांचा हात उंचावत विजयाची ग्वाही देणारे फोटो व्हायरल झाले. तसेच ते राणे यांच्यासोबत खासगी विमानातून रत्नागिरी आणि त्याच विमानाने मुंबईला रवाना झाले.

यामुळे आता बाळ माने यांचा लवकरच भाजप प्रवेश अशा चर्चा रंगल्या. याच चर्चांवरून शनिवारी (ता.६) मुंबईत फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला ज्यावर त्यांनी दोनच शब्दात प्रतिक्रिया दिली आणि विषय संपवला.

मात्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया आता बाळ मानेंच्या भाजप प्रवेश सुकर करणाऱ्या ठरल्याची चर्चा आहे. फडणवीस यांनी बाळ माने हे आमचेच असून ते आम्हाला परके नाहीत. पण प्रवेशाबाबत निर्णय मी घेत नसतो. तो निर्णय घेण्याचा अधिकार आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आहे. ते या प्रवेशावर निर्णय घेतील असेही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आता ठाकरेंनी हकालपट्टी केल्यानंतर खरच बाळ माने भाजपमध्ये दाखल होणार का? याकडे कोकणचे लक्ष लागले असून येथील राजकारणात मात्र चर्चांचा आणि तर्कवितर्कांनी जोर धरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT