Aditi Tatkare, Bharat Gogawale Sarkarnama
कोकण

Bharat Gogawale news : अखेर भरत गोगावलेंची 'ती' इच्छा पूर्ण; रायगडबाबत सरकारचा मोठा निर्णय; तटकरेंना दिला धक्का...

Republic Day flag hoisting : प्रजासत्ताकदिनी ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाचवेळी म्हणजे सकाळी सव्वा नऊ वाजता आयोजित केला जातो.

Rajanand More

Raigad Politics : राज्यात महायुती सरकारमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष आहेत. मात्र, अनेक जिल्ह्यांमध्ये या पक्षांतील नेत्यांमधून विस्तवही जात नाही. त्यामध्ये सातत्याने चर्चेत असलेले नेते म्हणजे भरत गोगावले आणि सुनील तटकरे. गोगावले सध्या मंत्री असून तटकरेंच्या कन्याही त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात आहेत.

रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिवसेनेचे नेते गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तटकरे दोघांनीही दावा सांगितला आहे. त्यामुळे सरकारला वर्ष उलटून गेल्यानंतरही हा तिढा सुटलेला नाही. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन जवळ आला की या वादात पुन्हा ठिणगी पडते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आतापर्यंत तटकरे यांनाच रायगड जिल्ह्यात ध्वजारोहणाचा मान मिळालेला आहे.

याच मुद्द्यावरून गोगावले यांच्या मनातील खदखद अनेकदा समोर आली आहे. ती आजही आली. आमच्या हस्ते ध्वजारोहण व्हावे, ही जनतेची इच्छा असल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर काही तासांतच त्यांची ही इच्छा फडणवीस सरकारने पूर्ण केली आहे. येत्या प्रजासत्ताक दिनी गोगावले हेच रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयावर ध्वजवंदन करतील, यावर सरकारने शिक्कामोर्तब केले आहे.

सामान्य प्रशासन विभागाने आज याबाबतचा जीआर जारी केला आहे. प्रजासत्ताकदिनी ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाचवेळी म्हणजे सकाळी सव्वा नऊ वाजता आयोजित केला जातो. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत शिवाजी पार्क येथे प्रमुख समारंभामध्ये ध्वजवंदन कार्यक्रम होईल. तर विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी पालकमंत्री, मंत्री किंवा राज्यमंत्र्याच्या हस्ते ध्वजवंदन होईल. त्याची यादी जीआरमध्ये प्रसिध्द करण्यात आली आहे.

या यादीत रायगड जिल्ह्यासमोर भरत गोगावले यांचे नाव आहे. त्यामुळे भरत गोगावले यांची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे. एकप्रकारे यावेळी त्यांनी तटकरेंवर मात केल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, रायगडप्रमाणेच नाशिकध्येही पालकमंत्रीपदावर अद्याप निर्णय झालेला नाही. तिथेही महायुतीतील तिन्ही पक्षात वाद आहे. आतापर्यंत भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनीची ध्वजारोहण केले आहे. यावेळी त्यांच्यावरच ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. तर पालकमंत्रीपदासाठी फिल्डींग लावलेल्या दादा भुसे अमरावतीत ध्वजवंदन करतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT