Devendra Fadnavis, Narendra Modi, Bhaskar Jadhav Sarkarnama
कोकण

Bhaskar Jadhav : पंतप्रधान मोदी, फडणवीसांची नजर BMC च्या...

सरकारनामा न्युज ब्युरो

Ratnagiri Political News :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 जानेवारीला मुंबईचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी शिवडी-न्हावाशेवा समुद्रपुलाचे उद्घाटन केले. यावरून आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी टीकेची तोफ डागली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची नजर मुंबईवर आहे आणि मुंबई महापालिकेच्या (BMC) 99 हजार कोटींच्या मुदत ठेवींवर आहे, असा गंभीर आरोप भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केला आहे. त्याचवेळी मुंबईला काही देण्याबाबत पंतप्रधानांनी अवाक्षरही काढले नाही, यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आपण पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांचे भाषण ऐकले. त्यांच्या भाषणाचा एकच गाभा होता, तो म्हणजे मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी. मुंबई महापालिकेकडे अंदाजे 99 हजार कोटींची रक्कम मुदत ठेवीमध्ये आहे.

ही रक्कम संपूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महापालिकेकडे 25 ते 27 वर्षे आहे आणि या रकमेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डोळा दिसतोय, कारण त्यांच्या ताब्यातील नागपूर (Nagpur) महापालिका पूर्णपणे कंगाल झालेली आहे, असा गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी केला.

पंतप्रधानांच्या नाशिक, मुंबई दौऱ्यानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही जोरदार टीका केली होती. त्यावेळी त्यांनी अटल सेतूचे (Mumbai Trans Habour LInk - MTHL) उद्घाटन, पण अटलबिहारी वाजपेयींचा फोटोही नव्हता, अशी टीका केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यांच्याकडे फक्त पिंपरी-चिंचवड महापालिका आहे. पिंपरी, चिंचवड ही महापालिका भाजपाकडे जनतेने दिली आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये लूट झाली. स्थायी समितीच्या अध्यक्षांनी जवळजवळ 900 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. तो बाहेर आला आणि म्हणून मुंबईचा विकास करणे हा विषय राहिला. पंतप्रधानांनी केंद्र सरकार मुंबई महापालिकेला काय देणार, याबाबत अवाक्षरसुद्धा काढलं नाही, अशी टीका जाधव यांनी केली.

मुंबईच्या विकासासाठी नाही, तर मुंबईच्या तिजोरीवर पंतप्रधान मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नजर आहे, हे 12 जानेवारीच्या मुंबईतील कार्यक्रमातून जाणवले, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.

(Edited by Avinash Chandane)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT