Bjp News मोदींच्या घराणेशाहीच्या विरोधामुळे भाजपचीच गोची, घराणेशाहीचे मूळ रुजतेय नाही, तर वाढतेय पक्षातच...

Political News : येथे होते फक्त गावकी-भावकी, नात्या-गोत्याचेच राजकारण, मग घराणेशाहीच्या राजकारणाला कसा विरोध होणार?
Narendra modi, mahesh landge, ashvini jagtap, vilas lande
Narendra modi, mahesh landge, ashvini jagtap, vilas landeSarkarnama
Published on
Updated on

Pimpri News : महाराष्ट्र दौऱ्यावर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीविरुद्धचा राग पुन्हा एकदा आळवला. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यातून त्यांचे लक्ष्य हे राज्यात पुन्हा एकदा ठाकरे, पवार, तर केंद्रात नेहरू आणि गांधी घराणे होते. मात्र, त्यांच्या या वक्तव्याने पिंपरी-चिंचवडसह राज्य आणि देशभरात भाजपचीच गोची झाली. कारण त्या पक्षातही आता घराणेशाही मूळ धरू लागली असून, त्याचा त्यांनीच विचार करण्याची वेळ आली आहे.

उद्योगनगरीत फक्त गावकी-भावकीचेच, नात्या-गोत्याचेच राजकारण चालणाऱ्या भाजपममधील ही घराणेशाही सर्वाधिक आणि उठून दिसणारी आहे. त्यामुळे त्यांनीच ती प्रथम रोखावी वा त्याला विरोध करावा, अशी चर्चा शहरात मोदींवरील मागणीनंतर सुरू झाली आहे.

दरम्यान, मोदींच्या घराणेशाहीच्या रोखाचा समाचार त्यांचे राज्यातील मुख्य टार्गेट शरद पवार यांनी लगेच घेतला. जुन्नर (जि. पुणे) येथील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरीज आणि इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरण सोहळ्याात बोलताना त्यांनी वकिलाचा मुलगा वकील, डॉक्टरचा डॉक्टर, शेतकऱ्याचा शेतकरी होतो, तर पुढाऱ्याचा तो पुढारीच झाला, तर बिघडले कुठे, अशी विचारणा करीत मोदींचा आरोप खोडून काढत राजकारणातील घराणेशाहीचे समर्थनच केले होते.

२२ तारखेच्या अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण आपल्याला आले नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. त्यासोबतच ते आले असते, तरी या गर्दीत गेलो नसतो. मात्र, नंतर नक्की जाईन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Narendra modi, mahesh landge, ashvini jagtap, vilas lande
Nagar Political : महायुतीचा मेळावा म्हणजे खुर्चीसाठी रेटारेटी...! कोपरखळ्या मारण्यात नेत्यांनी मानली धन्यता...

चिंचवड मतदारसंघाचे आतापर्यंतचे सर्व आमदार एकाच कुटुंबातील

राजकारणातील घराणेशाहीला असलेल्या मोदींच्या विरोधामुळे उद्योगनगरीत, मात्र भाजपचीच गोची झाली आहे. कारण येथेच राजकारणातील सर्वाधिक घराणेशाहीही या पक्षातच आहे. महायुतीतील पक्षही त्यात आघाडीवर आहेत. सर्वच पक्षांत ती आहे. पण, भाजपमधील घराणेशाही ठळकपणे जाणवते.

सध्या भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap) आहेत. यापूर्वीही त्यांचे ज्येष्ठ बंधू चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हेही शहराध्यक्ष होते. एवढेच नाही, तर चिंचवड मतदारसंघ निर्माण झाल्यापासून २००९ पासून या मतदारसंघाचे तेच सलग तीनदा आमदार राहिले. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर गेल्यावर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी या आमदार झाल्या आहेत, तर त्यांचे दीर म्हणजे शंकर हे पक्षाचे शहराध्यक्ष आहेत.

नगरसेवक, पक्ष पदाधिकारी पदातही घराणेशाही

शहरातील भाजपच्या विधान परिषद सदस्या उमा खापरे (Uma khapre) यांचे पुत्र जयदीप हे पक्षाचे क्रीडा आघाडी अध्यक्ष आहेत. पक्षाचे माजी स्वर्गीय शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांच्या पत्नी आशा या नगरसेविका राहिल्या आहेत. याच पक्षाचे गत टर्ममधील स्थायी समिती सभापती तथा अध्यक्ष विलास मडिगेरी यांच्या पत्नी वर्षा याही माजी नगरसेविका होत्या. गत टर्ममधीलच भाजपचेच स्थायीचे माजी चेअरमन अॅड. नितीन लांडगे यांचे वडील ज्ञानेश्वर लांडगे हे शहराचे पहिले महापौर आणि पहिले आमदार आहेत. शहरातील पक्षाचे तिसरे आमदार भोसरीचे महेश लांडगे यांची ही दुसरी टर्म आहे. त्यांचे बंधू सचिन ऊर्फ भय्या लांडगे यांनी अगोदर नगरसेवकपदाची निवडणूक लढवली आहे, तर आता त्यांच्या पत्नी पूजा लांडगे अधिक सक्रिय झाल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इतर पक्षही अपवाद नाहीत, सर्वच पक्षांत घराणेशाही

शहरातील तीनपैकी भोसरी आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात राजकारणातील घराणेशाहीचा मोठा पगडा आहे. त्या तुलनेत पिंपरीत तो कमी आहे. भोसरीचे प्रथम आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विलास लांडे (Vilas lande) यांचे वडील विठोबा लांडे हे नगरसेवक होते. त्यानंतर विलास लांडे झाले. महापौर, आमदार येथपर्यंत त्यांनी मजल मारली. ते अद्याप राजकारणात सक्रिय असून, आगामी लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीतही आहेत. दुसरीकडे त्यांची राजकारणातील घराणेशाही त्यांची पत्नी मोहिनी यांनीही पुढे चालू ठेवली. त्याही महापौर झाल्या, तर आता त्यांचा मुलगा विक्रांत तो पुढे चालवित आहे. गत टर्मला तो नगरसेवक होता. त्यानंतर ही घराणेशाही त्यांचे पुत्र विक्रांत हे आता पुढे चालवित आहेत.

माजी महापौर भिकू वाघेरेनंतर त्यांचे पुत्र संजोग वाघेरे हे महापौर झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी उषा या स्थायीच्या माजी सभापती राहिल्या. आता त्यांचा मुलगा ऋषिकेश राजकारणात आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीतून वाघेरे हे नुकतेच ठाकरे शिवसेनेत दाखल झाले आहेत.

माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांच्यानंतर त्यांच्या पत्नी माई तापकीर नगरसेविका झाल्या. हा राजकीय वारसा आता त्यांचे पुत्र सागर तापकीर हे पुढे चालवित आहेत. आगामी महापालिका निवडणूक लढण्याची तयारी त्यांनी राष्ट्रवादीकडून सुरू केली आहे. मावळचे पहिले खासदार पिंपरी-चिंचवडकर गजानन बारणे यांचे बंधू मधुकर आणि प्रकाश या दोघांनीही नगरसेवकपद भूषविले. भावजय शारदा याही गत टर्मच्या नगरसेविका आहेत.

राजकारण गावकी-भावकीचे, नात्या-गोत्याचेच

उद्योगनगरीत निवडणूक कोणतीही असो, राजकारण गावकी-भावकीचे, नात्या-गोत्याचेच होते. त्यामुळे आतापर्यंत शहरावर जगताप, लांडगे, लांडे, कलाटे, भोईर, शितोळे, वाघेरे, तापकीर, नखाते या नात्या-गोत्यातील गावकी-भावकीतील काही कुटुंबांचेच प्रामुख्याने वर्चस्व राहिलेले आहे. त्यांची राजकारणात घराणेशाही सुरू आहे. चार ग्रामपंचायतींची नगरपालिका आणि नंतर महापालिका होऊनही चार दशकांनंतरही ती कायम आहे, हे विशेष. फक्त त्यांच्या जोडीला शेट्टी, बहल अशा काही मूळच्या बाहेरच्या, पण आता पिंपरी-चिंचवडकर झालेल्या कुटुंबांचा शहराच्या राजकारणावर थोडा प्रभाव आहे.

(Edited by Sachin Waghmare)

R...

Narendra modi, mahesh landge, ashvini jagtap, vilas lande
BJP News : आमचा वापर केवळ कढीपत्ता म्हणून..., महायुतीच्या बैठकीत नाराजी नाट्य

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com