Bhaskar Jadhav Vikrant Jadhav sarkarnama
कोकण

Vikrant Jadhav : भास्कर जाधवांच्या मुलाची दादागिरी, शिवीगाळ करत मारहाण; म्हणाला, 'परत हात उचलीन...'

Bhaskar Jadhav Vikrant Jadhav : भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव याने शिवीगाळ करत मंत्री योगेश जाधव यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी विक्रांत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Roshan More

Vikrant Jadhav News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत याने रत्नागिरीमध्ये लोटे एमआयडीसीमध्ये दादागिरी करत युवा सेनेच्या उपजिल्हा प्रमुखाला शिवीगाळ करत मारहाण केली. मारहाण झालेली व्यक्ती ही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा कार्यकर्त्या असल्याचे सांगितले जात आहे. या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीमधील बांधकाम ठेक्यावरून विक्रांत जाधव यांनी मारहाण करत तुझ्यावर हात उचलला परत उचलीन, अशी धमकी दिली. तुमचा मंत्री आहे म्हणून तुम्ही वाटेल ते करणार का? असा जाब विचारला.

दरम्यान, या प्रकरणी विक्रांत जाधव यांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार विक्राज जाधव यांच्यासह सात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बळाचा वापर, मारहाण,धमकी देणे, शिविगाळ,शांतता भंग करणे आदी 189(1), 189( 2 ), 190, 191 (2) 115 (2) 352, 351 (3) या भारतीय दंडसंहितेनुसार अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या मारहाणीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमधील शिवसेनेतील वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. मारहाणीमुळे चिपळूण आणि गुहागरमधील राजकीय वातावरण तापले असून या प्रकरणाचे गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वातवारण तापणार...

नगरपंचायत, नगपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात जाहीर होणार आहेत. त्यामुळे रत्नागिरीच्या राजकारणात विक्रांत जाधव यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT