Eknath Khadse News: पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत आले आहेत. संदर्भात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीही उडी घेतली आहे. या निमित्ताने त्यांनी वेगळीच मागणी पुढे केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पुणे येथील महार वतन जमिनीचा व्यवहार केला. अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींना खरेदी केली. त्याचे शासकीय मुद्रांक शुल्क देखील माफ झाले. हे अजित पवारांच्या नावाचा वापर केल्या शिवाय शक्यच नाही, आसा आरोप खडसे यांनी केला.
या प्रकरणावरून राज्यातील महायुती सरकार अडचणीत आले आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी या प्रकरणात अनेक प्रश्न आणि त्रुटी उघड केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे या प्रकरणात एकनाथ खडसे यांनी करेक्ट वेळेवर एंट्री केली.
खडसे म्हणाले, एक लाख रुपये भाग भांडवल असलेल्या पार्थ पवार यांच्या कंपनीकडे तीनशे कोटी रुपये आले कुठून? हा पैसा कोणी दिला? कुठून आला? असे अनेक गंभीर प्रश्न आहेत. सामान्यांच्या मनातील प्रश्न आहे, त्याची चौकशी झालीच पाहिजे.
या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहभाग असू शकतो. त्यांचे नाव तर नक्कीच वापरले गेले असे. त्याशिवाय या सरकारी जमिनीच्या खरेदीचे प्रकरण ४८ दिवसात कसे काय क्लियर होते? असा प्रश्न खडसे यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सत्तर हजार कोटीचा पाटबंधारे घोटाळा त्यांनीच सांगितलं होतं. अजित पवार यांना चक्की पिसिंग चक्की पिसिंग करायला लावणार हे वाक्य फडणवीसांचेच आहे.
राष्ट्रवादीशी युती कदापी नाही अशी युती झाल्यास प्रसंगी अविवाहित राहील पण लग्न करणार नाही, असेही फडणवीसच बोलले होते. हे सर्व भ्रष्टाचार बाजूला ठेवून वाजत गाजर अजित पवार यांना मुख्यमंत्री करणारे देवेंद्र फडणवीस हेच आहेत हे विसरता कामा नये, असे खडसे म्हणाले.
या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींकडून चौकशी झाली पाहिजे. कारण अन्य चौकशी केल्यास सरकार हे प्रकरण दडपल्याशिवाय राहणार नाही. कोणतीही सरकारी अथवा एमआयडीसीची जमीन नसताना माझ्यावर आरोप करण्यात आले.
यानिमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस आणि खडसे राजकीय वादालाही त्यांनी नव्याने खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला आहे. थेट फडणवीस यांच्यावर अविश्वास दाखवला. मला चौदा खात्यांचा मंत्री असताना नैतिकदृष्ट्या राजीनामा देण्यास भाग पडण्यात आले. हीच नैतिकता अजित पवार यांच्याबाबत दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले.
----------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.