Bhiwandi Explosives Seized Sarkarnama
कोकण

Bhiwandi Explosives Seized : भिवंडीत स्फोटकांचा खेळ उघड; राजकीय नेत्याच्या भावाचे नाव समोर आल्याने खळबळ

Thane Crime Branch seizes huge stock of illegal explosives in Bhiwandi; former mayor Vilas Patil brother among accused : ठाणे स्थानिक गुन्हे शाखेने भिंवडीच्या जानवळ परिसरात छापा टाकत बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेला स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला.

Pradeep Pendhare

Bhiwandi news : भिवंडी तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी मोठी कारवाई समोर आली आहे. ठाणे स्थानिक गुन्हे शाखेने जानवळ परिसरात छापा टाकत बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेला स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला.

या कारवाईत 306 जिलेटिन कांड्या, 110 डेटोनेटर, स्फोटक खरेदी-विक्रीची नोंद असलेली रजिस्टर आणि अन्य साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणात सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे भिवंडीचे माजी महापौर (Mayor) आणि विद्यमान नगरसेवक विलास पाटील यांच्या भावाचे नाव समोर आले आहे. पोलिसांनी नितीन पाटील याच्यासह एकूण सात जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल केला आहे.

ठाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर पडघा पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींमध्ये अक्षय रोड्डेवार, वीरेंद्रकुमार सिंग, वसंत लोणे, नितीन पाटील, शत्रुघ्न चव्हाण, दिनेश पाटील आणि मनीष पाटील यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पाच आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी अजूनही पसार आहेत. विशेष म्हणजे फरार आरोपींमध्ये नितीन पाटील यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे की, हा मोठा स्फोटकांचा साठा नेमका कोणत्या कामासाठी जमा करण्यात आला होता? याचा वापर कुठे होणार होता आणि या संपूर्ण रॅकेटमागे आणखी कोणाचा हात आहे का? याचा तपास ठाणे स्थानिक गुन्हे शाखा आणि पडघा पोलिस युद्धपातळीवर करत आहेत.

या कारवाईमुळे भिवंडीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आगामी काळात या प्रकरणातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT