Rajan Salvi News Sarkarnama
कोकण

Rajan Salvi News : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींना मोठा धक्का ; कट्टर समर्थक असलेल्या 'या' बड्या नेत्यानं सोडली साथ

Shivsena Political News : माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा दोन दिवसीय कोकण दौरा नुकताच आटोपला आहे. त्यांची पाठ फिरताच...

Deepak Kulkarni

Ratnagiri News : शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर ठाकरेंसोबत राहिलेल्या काही महत्वाच्या नेत्यांपैकी राजापूरचे आमदार राजन साळवी यांचा समावेश होता.ठाकरेंचे निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिक अशी ओळख साळवींची आहे. त्यांच्या मागेदेखील एसीबीने चौकशीचा ससेमिरा लावला आहे. त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चाही जोर धरु लागल्या होत्या. अडचणीत सापडलेल्या साळवींना पुन्हा एकदा धक्का बसला आहे.

माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा दोन दिवसीय कोकण दौरा नुकताच आटोपला आहे. या दौऱ्यांनी ठाकरेंनी आगामी निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी करतानाच रामदास कदमांच्या विरोधात संजय कदमांचे तिकीटही कन्फर्म केल्याची चर्चा आहे. पण ठाकरेंची पाठ फिरताच आता ठाकरे गटाचे नेते, आमदार राजन साळवींचे कट्टर समर्थक आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती दीपक नागले यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह रविवारी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू आणि उद्योजक किरण सामंत यांनी नागले व त्यांच्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

ठाकरेंचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे आमदार राजन साळवी यांच्याच नेत्याला शिंदेंनी फोडल्याने पुन्हा एकदा कोकणातलं राजकारण तापण्याची शक्यता आहे. राजन साळवी (Rajan Salvi) यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे दीपक नागले यांनी शिंदे गटात केलेल्या प्रवेश केला आहे.

नागलेंसह राजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहास वारीक,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित,महिला आघाडीप्रमुख शिल्पा सुर्वे,माजी नगरसेवक रोशन फाळके,कशेळी येथील कुणबी बॅंकेचे संचालक विद्याधर गोठणकर, तालुकाप्रमुख बाबू म्हाप यांच्यासह गटप्रमुख, मोगर ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षा थारळी,उपसरपंच राजाराम नावणेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.(Shivsena )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे दीपक नागले यांनी अचानक शिक्षण व आरोग्य महत्वाची कारणे आहेत. विकास महत्वाचा मुद्दा असून राजापूर ग्रामीण भागातील विकास महत्वाचा आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी विकास हा मुद्दा घेत ज्याप्रमाणे विकासाची घोडदौड करत आहेत. त्याच विकासकामाचा मुद्दा आमच्यासाठी महत्वाचा आहे. त्यासाठी आम्ही प्रेरित होऊन एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला असल्याचे माजी सभापती नागलेंनी सांगितले.

ठाकरेंच्या कोकण मोहिमेला पुन्हा ब्रेक..?

माजी मंत्री आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी कोकण पदवीधर मतदारसंघ आपण जिंकणार म्हणजे जिंकणार असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच उद्धव ठाकरेंविषयी जनतेत क्रेझ निर्माण होत आहे.येत्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे.

महाराष्ट्र वेगळ्या परिस्थितीत आहे. सध्या १६ आमदार आमचे आहेत . पण नक्की याचे १६० आमदार होतील. शिवसैनिक आता पेटून उठले आहेत. तुम्ही मेहनत घेतली तर ही निवडणूक आपण जिंकणारच आहोत. एवढचं नाही तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही आपण जिंकणार म्हणजे जिंकणार, असेही ते म्हणाले.


(Edited By Deepak Kullkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT