Konkan Political News Sarkarnama
कोकण

कोकणातील निवडणुकीत ठाकरेंचा धुव्वा; शिंदे गट अन् भाजपने एक हाती सत्ता मिळवली

Konkan Political News : कोकणातील (Konkan) निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena) पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Konkan Political News : कोकणातील (Konkan) निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाची सत्ता असलेल्या सावंतवाडी खरेदी विक्री संघ निवडणुकीत भाजप (BJP) आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या युतीने एक हाती विजय मिळवला आहे. एकूण १५ जागांपैकी पैकी एकही जागा ठाकरे गटाला जिंकता आली नाही.

शनिवारी झालेल्या सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना व भाजपच्या युतीने कोकणात प्रथमच खाते उघडले. या ठिकाणी १५ पैकी १५ जागा या युतीने निवडून आणल्या आहेत. तर महाविकास आघाडीला या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला. यातील एक जागा प्रथमच बिनविरोध निवडणून आली आहे.

या निवडणुकीत १४ जागांसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत सर्व जागा युतीच्या ताब्यात गेल्या. या युतीचा हा कोकणातील पहिलाच विजय असल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी जोरदार जल्लोष केला. खरेदी विक्री संघात निवडून देऊन विश्वास व्यक्त करणाऱ्या मतदारांचे विजयी उमेदवारांनी आभार मानले.

राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या मतदार संघात सावंतवाडीमध्ये खरेदी विक्री संघाची निवडणूक पार पडली. शिवसेनेतील दोन्ही गटांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. महाविकास आघाडीने सावंतवाडी खरेदी-विक्री संघावरील आपली सत्ता कायम राखण्यासाठी ताकद पणाला लावली होती. भाजप आणि शिंदे गटाने शिवसेनेविरोधात (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जोरदार मोर्चे बांधणी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT