अशोक पवारांवर विश्वास ठेवत तुम्ही एकजूट राखली अन्‌ जिंकलात...भले शाब्बास : ‘घोडगंगा’च्या संचालकांचे अजितदादांकडून अभिनंदन

नव्या संचालक मंडळाला शाबासकी देताना अजितदादांनी तब्बल दीड तास त्यांच्याशी साखर कारखानदारीसमोरील आव्हाने, नवे बदल, देशपातळीवरील साखर धंद्याची स्थिती यावर सविस्तर चर्चा केली.
Ghodganga Sugar Factory's Director
Ghodganga Sugar Factory's DirectorSarkarnama

शिरूर (जि. पुणे) : तुम्ही एकजुट ठेवली, आरोपांमुळे चलबिचल होऊ दिली नाही...'आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांचे नेतृत्व मार्ग काढेल', हा विश्वास ठेवला... सगळे एकदिलाने त्यांच्या पाठिशी उभे राहिले, त्यातूनच हे चांगले यश मिळवू शकला... भले शाब्बास...! रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यातील (Sugar Factory) यशाबद्दल, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कारखान्याचे अध्यक्ष, आमदार ॲड. अशोक पवार व नवनिर्वाचीत संचालक मंडळाचे कौतुक करीत अभिनंदन केले. नव्या संचालक मंडळाला जबाबदारीची जाणीव करून देताना साखर कारखानदारीतील टेक्निकल मुद्द्यांचीही सविस्तर माहिती दिली. (Ajit Pawar congratulated the new director of Ghodganga Sugar Factory)

आमदार ॲड. अशोक पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत शेतकरी पॅनेलने, शिरूर तालुक्यातील घोडगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीत उज्ज्वल यश संपादन केल्यानंतर नूतन संचालक मंडळाने अजितदादांची भेट घेतली. नव्या संचालक मंडळाला शाबासकी देताना प्रत्येक नवनिर्वाचीत संचालकाचे अभिनंदन करताना अजितदादांनी तब्बल दीड तास त्यांच्याशी साखर कारखानदारीसमोरील आव्हाने, कारखानदारीतील नवे बदल, देशपातळीवरील साखर धंद्याची स्थिती याविषयावर सविस्तर चर्चा केली.

Ghodganga Sugar Factory's Director
मोठी बातमी : महापालिका-नगरपालिकांची डिसेंबरमध्ये रणधुमाळी; दुसऱ्या टप्प्यात झेडपी, पंचायत समिती

आमदार ॲड. पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे व आंबेगाव-शिरूर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्याकडून अजितदादांनी निवडणुकीतील स्थितीची माहिती घेतली. विरोधकांनी कारखाना कर्जबाजारी झाल्याचा मुद्दा घेऊन रान पेटविले होते. तथापि, आपण मांडवगण मध्ये येऊन कर्जाच्या मुद्द्याचा पुराव्यांसह परामर्श घेतला. कर्जाबाबत आपण जाहीर सभेत मांडलेली वस्तुस्थिती शेतकरी उस उत्पादकांना भावली. त्यातून उस उत्पादकांतील संभ्रम दूर झाला, असे रवीबापू काळे यांनी त्यांना सांगितले. दादा, तुम्ही थेट मांडवगणला येऊन जो विश्वास लोकांच्या मनात निर्माण केला, त्यातून विरोधी पॅनेलच्या मुद्द्यातील हवा निघाली आणि एकतर्फी विजय मिळवता आला, असे मानसिंग पाचुंदकर यांनी सांगितले.

Ghodganga Sugar Factory's Director
शहाजीबापू पाटलांना घेरण्याची उद्धव ठाकरेंची रणनीती : कट्टर विरोधकास पाठबळ!

संचालक मंडळाशी चर्चा करताना अजितदादांनी काटकसरीवर भर देतच पुढे जावे लागेल, अशी सूचना केली. ते म्हणाले, "साखरधंदा शेतीसाठी उपयुक्त आहे. त्यावर शेतकरी समाजाची समृद्धी अवलंबून आहे. कारखानदारीचा कारभार हाती घेताना कुठे-कुठे काटकसर केली पाहिजे, त्याला प्राधान्य द्यावे लागेल. आपण जे करतोय, ते शेतकरी वर्गासाठी. म्हणून कुठलाही निर्णय घेताना, शेतकऱ्याला दोन रूपये अधिकचे कसे देता येतील, अशीच आपल्या सर्वांची भूमिका हवी. को - जन प्रकल्पामुळे घोडगंगा कारखान्याला मोठा त्रास सहन करावा लागला. वीजखरेदी करार वेळेत झाला असता तर कारखान्याचा आणि उसउत्पादकांचा फायदा झाला असता, असेही त्यांनी नमूद केले.

Ghodganga Sugar Factory's Director
पाटील-परिचारकांविरोधात आता सर्वच निवडणुकांत महाडिकांचा उमेदवार असणार : महाडिकांचे आव्हान

रॉ शुगर, व्हाईट शुगर एक्स्पोर्ट केली पाहिजे, व्याजाचा भूर्दंड वाचवला पाहिजे, साखर पोते जास्त दिवस कारखान्याकडे राहिल्यास त्याच्या व्याजाचा बोजा वाढत जातो, ते टाळले पाहिजे, अशा सूचनाही अजितदादांनी केल्या.

Ghodganga Sugar Factory's Director
राजन पाटलांचा भाजप प्रवेश लटकणार..?: धनंजय महाडिकांनी घेतली ही भूमिका

नरवडे-दरेकरांचा अनोखा प्रचार

रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यातील घवघवीत यशाबद्दल अजितदादांनी आमदार ॲड. अशोक पवार व त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांना शाबासकी देताना त्यांच्या नियोजनाला दाद दिली. तसेच या निवडणुकीच्या माध्यमातून साखर कारखानदारीत 'एन्ट्री' केलेल्या ऋषिराज पवार यांचे आवर्जून अभिनंदन केले. या निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारकाळात शिरूर खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडीत दरेकर हे डोक्याला, पॅनेलचे चिन्ह असलेली छत्री लावून फिरले. त्यांचेही अजितदादांनी आवर्जून कौतुक केले.

Ghodganga Sugar Factory's Director
केंद्रीय मंत्र्यांनी टपरीवर घेतला चहाचा आस्वाद अन्‌ पैसेही दिले...!

अजितदादांची साथ महत्वाची

नुकत्याच झालेल्या रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलला घवघवीत यश मिळाले. हे यश मिळवून देण्यात अजितदादा पवार यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांचे बहुमोल मार्गदर्शन आम्हाला या निवडणुकीत लाभले. प्रत्येक परिस्थितीत अजितदादा आमच्या पाठिशी भक्कमपणे उभे असतात. त्यांचे लाभणारे मार्गदर्शन व साथ आमच्यासाठी कायमच महत्वपूर्ण व मोलाची आहे, असे रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा आमदार ॲड. अशोक पवार यांनी सांगितले.

माजी आमदार पोपटराव गावडे व सूर्यकांत पलांडे, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार व राजेंद्र जगदाळे, पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक ॲड. स्वप्निल ढमढेरे, बालाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदाशिव पवार, शिरूर बाजार समितीचे सभापती ॲड. वसंतराव कोरेकर, माजी सभापती प्रकाश पवार व शंकर जांभळकर, शिरूर खरेदी - विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडीत दरेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, युवकचे उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड आदींसह तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व कारखान्याचे आजी - माजी संचालक यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com