BJP
BJP  Sarkarnama
कोकण

सिंधुदुर्गात भाजपमध्ये दुफळी; निवडणुकीनंतर राजन तेली यांनी घेतला मोठा निर्णय

सरकारनामा ब्यूरो

सिंधुदुर्ग : दोडामार्गा तालुक्यामध्ये भाजपची (BJP) कार्यकारीणी बरखास्त करण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या नगराध्यक्ष निवडीवेळी (Nagar Panchayat Election) भाजपच्या नगरसेवकांचा एक गट अनुपस्थित राहिला. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा भाजपने गंभीर दखल घेतली आहे. नगराध्यक्ष निवड कालच झाली आणि आज तेथील भाजपची कार्यकारिणी बरखास्त केल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli) यांनी केली. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

दोडामार्गमध्ये मोठ्या प्रमाणात गटातटाचे राजकारण होत आहे. त्यामुळे याचा फटका जिल्हा बँक निवडणुकीपासून ते नगरपंचायत निवडणुकपर्यंत बसला आहे. काही लोक पक्षशिस्त न मानता काम करत आहे. भाजपत पक्ष शिस्त महत्त्वाची असून ती मोडली गेल्यास कारवाई होते. यामुळे ही कारवाई केल्याचे तेली यांनी सांगितले. सोमवारी भाजपचे चेतन चव्हाण हे कसई दोडामार्ग नगरपंचयातचे नगराध्यक्ष झाले. आज कार्यकारिणी बरखास्त झाल्याने नेमके काय चुकले? ,याचे उत्तर भाजप पदाधिकारी यांना शोधावे लागणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील चार नगरपंचायतच्या नगराध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला धक्का दिला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या या नगरपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीने चार पैकी दोन नगरपंचायत त्यांच्याकडून खेचून आणल्या. कुडाळ (Kudal) नगराध्यक्ष निवडीत काँग्रेसच्या (Congress) आफ्रीन करोल तर उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेचे मंदार शिरसाठ यांची निवड झाली.

देवगड-जामसंडे नगरपंचायतमध्ये शिवसेनेच्या साक्षी प्रभू नगराध्यक्ष तर राष्ट्रवादीच्या मिताली सावंत उपनगराध्यक्ष झाल्या. वैभववाडीमध्ये नगराध्यक्षपदी भाजपच्या नेहा माईनकर तर उपनगराध्यक्षपदी संजय सावंत विजयी झाले. तर प्रतिष्ठेच्या कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बाजी मारली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT