BJP News
BJP News Sarkarnama
कोकण

Kokan Loksabha : शिंदे गटाची धाकधूक वाढली; कोकणातील दोन्ही लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा...

मुझफ्फर खान

Konkan News : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रमुख नियुक्ती केल्या आहेत. या नवनिर्वाचित प्रमुखांवर लोकसभा व विधानसभा मतदारसंघनिहाय पक्ष संघटनात्मक वाढीसाठी जबाबदारी सोपवल्या आहेत.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुखपदी प्रमोद जठार यांची नियुक्ती केली आहे. (BJP eyes on both Lok Sabha constituencies in Konkan)

आगामी लोकसभा (Loksabha Election) आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप (BJP) कामाला लागल्याचे दिसत आहे. संघटनात्मक बांधणीवर भाजपचा जोर आहे. भाजपने रायगड लोकसभा निवडणूक प्रमुखपदी सतीश धारप, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख पदी प्रमोद जठार यांची नियुक्ती केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीला केवळ वर्षभराचा कालावधी शिल्लक आहे. कोकणातील लोकसभेच्या या दोन्ही जागा भाजप स्वतंत्र लढणार की शिंदे सेनेला सोबत घेणार, याची उत्सुकता सर्वांना आहे.

शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपात कोकणातील या दोन्ही जागा शिवसेनेकडे होत्या. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेने जिंकली तर या रायगडच्या जागेवर शिवसेनेला अपयश आले. आता मात्र दोन्ही जागा ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे.

रत्नागिरी विधानसभा निवडणूक प्रमुखपदी माजी आमदार बाळ माने, गुहागर-माजी आमदार डॉ. विनय नातू, दापोली-केदार साठे, चिपळूण-संगमेश्वर-प्रमोद अधटराव यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी आमदार बाळ माने मागील काही दिवसांपासून संघटना बांधणीच्या कामात अलिप्त होते; परंतु अलीकडच्या काळात ते कमालीचे सक्रिय झाले आहेत.

तळकोकणातील संघटना बांधण्यासाठी भाजपने केंद्रीय मंत्र्यांनाही मैदानात उतरवले आहे. त्यामुळे कोकणात संघटना बांधणीसाठी भाजपने अधिक लक्ष घातल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT