Vikhe Patil Vs Raut : संजय राऊत हे वाया गेलेले प्रकरण; त्यांच्यापासून दूरच राहा : विखे पाटलांची जहरी टिका

राज्याच्या विविध भागात झालेल्या दंगलींचा संदर्भ देताना आमच्या सरकारला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे.
Sanjay Raut-Radhakrishna Vikhe Patil
Sanjay Raut-Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

बारामती : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे वाया गेलेले प्रकरण आहे, त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे, असा जोरदार हल्लाबोल राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. (Radhakrishna Vikhe Patil's criticism of Sanjay Raut)

पालखी सोहळ्याच्या तयारीच्या निमित्ताने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे बारामतीत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना सोलापूरचे पालकमंत्री विखे पाटील यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

Sanjay Raut-Radhakrishna Vikhe Patil
Mangalveda News : मंगळवेढ्याच्या दुष्काळी गावांना ‘म्हैसाळ’चे पाणी आले अन्‌ शेतकऱ्यांनी समाधान आवताडेंना पेढे भरविले

खासदार संजय राऊत हे वाया गेलेले प्रकरण आहे, त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. मी जेथे जातो, तेथील माध्यमांच्या बंधूंना त्यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला देतो, त्यामुळे तुम्ही देखील त्यांना फार महत्त्व देऊ नका, अशी जहरी टीका विखे पाटील यांनी राऊत यांच्यावर केली आहे.

राज्याच्या विविध भागात झालेल्या दंगलींचा संदर्भ देताना आमच्या सरकारला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे, असा आरोप विखे पाटील यांनी केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुटप्पी भूमिका या निमित्ताने राज्याच्या जनतेच्या समोर आली. देवेंद्र फडणवीस बारकाईने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असेही ते म्हणाले.

Sanjay Raut-Radhakrishna Vikhe Patil
KCR In Maharashtra: महाराष्ट्रातील आठ ते दहा माजी आमदार ‘केसीआर’च्या संपर्कात; हैदराबादमध्ये मुख्यमंत्र्यांशी झाली चर्चा

दूध दराच्या प्रश्नावर लवकरच राज्यातील सर्व सहकारी व खासगी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्यातील दुधाचे दर महाविकास आघाडी सरकारच्या काळात नीचांकी झाले होते. आमच्या सरकारच्या काळात ३९ रुपयांपर्यंत दर गेले होते. सध्या दुधाचे दर कमी होत आहेत, ही चिंताजनक बाब आहे. राज्य सरकार यात योग्य तो निर्णय निश्चित घेईल.

‘अमूल’ सारखी संस्था आज दुधाला चाळीस रुपये लिटर भाव देऊ शकत असेल, तर राज्यातील सहकारी संस्था असा भाव का देऊ शकत नाहीत. वाढीव खर्चाचा भार दूध उत्पादकांनी उचलायचा, हे योग्य नाही. त्यादृष्टीने आता काहीतरी निर्णय करावा लागेल. मात्र, हा निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील सर्व सहकारी व खासगी दूध उत्पादक संस्थांच्या प्रतिनिधींची भूमिकाही जाणून घेतली जाईल, असे विखे पाटील यांनी सांगितले.

Sanjay Raut-Radhakrishna Vikhe Patil
Pandharpur Politics: वडिलांनंतर... मुलालाही मुख्यमंत्र्यांनी पाठविले विमान; विजयदादांना पराभूत करणाऱ्या भारत भालकेंसाठीही चव्हाणांनी ‘प्लेन’ पाठविले होते

पशुखाद्य उत्पादकांना त्यांचे दर कमी करावे लागतील, नाहीतर सरकारला जात हस्तक्षेप करावा लागेल. त्यांनी दर कमी केले नाही, तर प्रसंगी पशुखाद्याच्या उत्पादनावर नियंत्रण आणण्याचा देखील सरकारला विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com