मतदानाच्या अवघ्या 24 तास आधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे.
जिल्हा नेतृत्वावर गंभीर आरोप करत पक्षाचा राजीनामा दिला.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांपूर्वीच या राजीनाम्यामुळे जिल्हा भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
Sindhudurg News : राज्यात एकीकडे महापालिका निवडणुकींच्या प्रचाराची सांगता झाली असून उद्या मतदान होणार आहे. तर शुक्रवारी (ता१६) मतमोजणी होणार आहे. याच्याआधीच राज्यात ६० हून अधिक ठिकाणी भाजपचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. नगरपालिका आणि नगरपंचायतींपाठोपाठ महापालिका निवडणुकीतही भाजप मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी देखील भाजपकडून आखणी केली जात आहे.
एकीकडे भाजपमध्ये चैतन्याने वारे वाहतच असताना मात्र तळकोकणात भाजपला मोठा धक्का बसला आहे. येथे भाजपच्या जिल्हा नेतृत्वांच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि अकार्यक्षमतेमुळे मालवण नगरपालिकेत भाजपचा पराभव झाल्याचा दावा राणे समर्थक व जुन्या निष्ठावान कार्यकर्ते तथा मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी करत त्यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
राज्यात एकीकडे महापालिकेच्या निवडणुकीची लगबग सुरू असतानाच ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी देखील मोर्चे बांधणी केली जात आहे. नुकताच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे तळकोकणात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान अद्याप येथे महायुती की महाआघाडी याबाबत चर्चा होताना दिसत नाही.
मात्र भाजपमधील अंतर्गत वाद उफाळूम बाहेर येताना दिसत आहे. नुकताच झालेल्या मालवण नगरपालिकेतील पराभववारून आता खडके उडताना दिसत आहे. तर मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी याच पराभवाचे खापर थेट जिल्हा नेतृत्वावर फोडत आपल्या सर्व पदाचा आणि पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे आता तालुक्याचे राजकारण तापले असून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपला धक्का देणारा आहे.
यावेळी बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, आपण हा निर्णय जाहीर जिल्हा नेतृत्वाने घेतलेल्या निर्णांमुळे घेत असून भाजपने कार्यकर्त्यांचा केवळ निवडणुकीपुरता वापर करून घेतल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी, गेली २२ वर्षे आपण भारतीय जनता पार्टीत एकनिष्ठपणे कार्यरत होतो. पण जिल्हा नेतृत्वाच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि अकार्यक्षमतेमुळे मालवण नगरपालिकेत पक्षाचा पराभव झाल्याचेही म्हटले आहे.
बाबा मोंडकर हे कट्टर राणे समर्थक व जुन्या निष्ठावान भाजप कार्यकर्ते मानले जातात. पण भाजपने जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून दुसऱ्या पक्षातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देऊन समांतर यंत्रणा राबवली असाही आरोप त्यांनी केला आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या वेळी जिल्हा नेतृत्वाकडून मित्रपक्षासोबत युती करण्याबाबत संभ्रम निर्माण करण्यात आला. सुरुवातीला युती नाकारली आणि नंतर कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता स्वतंत्र लढण्याची रणनीती आखली, यामुळेच भाजपचा निवडणुकीत पराभव झाला. तर जेव्हा आम्ही प्रश्न विचारले तेव्हा 'पटत नसेल तर राजीनामा द्या' असे उत्तरे वरिष्ठांकडून देण्यात आली.
यामुळे आता भाजप कार्यकर्त्यांचा केवळ निवडणुकीपुरता वापर करून घेत असल्याचे वाटत असल्याचा दावा देखील मोंडकर यांनी केला आहे. दरम्यान आता मोंडकर यांनी जिल्हा नेतृत्व म्हणत केलेली टीका नेमकी कोणासाठी होती अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. तर त्यांचा रोख हा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेल्या जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे असल्याचेही येथे बोलले जात आहे.
1. बाबा मोंडकर कोण आहेत?
ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष होते.
2. त्यांनी भाजपचा राजीनामा का दिला?
जिल्हा नेतृत्वावर गंभीर आरोप करत त्यांनी पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
3. हा राजीनामा कधी दिला गेला?
मतदानाच्या अवघ्या 24 तास आधी हा राजीनामा देण्यात आला.
4. या राजीनाम्याचा भाजपवर काय परिणाम होऊ शकतो?
स्थानिक पातळीवर भाजपची संघटनात्मक ताकद कमकुवत होण्याची शक्यता आहे.
5. पुढील निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर याचा प्रभाव पडू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.