सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 192 वस्त्या आणि 25 रस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्याचा आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला आहे.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील सामाजिक एकतेस चालना मिळणार असून भेदभावमुक्त ओळखीची नवी दिशा मिळेल.
जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली या नावबदलाची प्रक्रिया पुढील काही आठवड्यांत पूर्ण होणार आहे.
Sindhudurg News : राज्यासह देशात गावांस, शहरे रस्त्यांची नावे बदण्यात येत आहेत. पण ती काही धार्मिक कारणामुळे बदलत असल्याची टीका होत आहे. अशातच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाड्या आणि रस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्याची मागणी अनुसूचित जाती “समाज संवाद जनता दरबारात” करण्यात आली होती. त्या मागणीला आता यश आले असून तब्बल 192 वस्त्या आणि 25 रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तर या निर्णयामुळे या वाड्या आणि रस्त्यांना जातीवाचक नावा ऐवजी महापुरुष आणि लोकशाही मूल्यांवर नवी नावे मिळणार आहेत.
जिल्ह्यातील विविध वाड्या वस्त्या आणि रस्त्यांना जातीवाचक आणि जुनी नावे होती. ज्यामुळे अनेकदा गंभीर प्रश्नही निर्माण झाले आहेत. यामुळे अशी 192 वस्त्या आणि 25 रस्त्यांची नावे बदलून महापुरुषांची आणि लोकशाही मूल्यांची निगडित असलेली नावे देण्यात यावीत अशी मागणी सतत होत होती. त्याप्रमाणे आता जिल्हा प्रशासनाने नावे बदलण्याचा निर्णय घेतला असून शहरी आणि ग्रामीण भागातील हरिजनवाडी, जाधववाडी, चर्मकारवाडी, बौद्धवाडी अशा जातिवाचक नावे बदलण्यात येणार आहेत.
जुलै महिन्यात अनुसूचित जातीसाठी आयोजित करण्यात आलेल्या समाज संवाद आणि तक्रार निवारण जनता दरबारात पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे याबाबत मागणी करण्यात आली होती. तसेच हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचेही निर्दशनास आणून देण्यात आले होते. त्याचवेळी नितेश राणे यांनी नावे बदण्याचा निर्णय घेत प्रशासनाने लवकर कार्यवाही करावी असे आदेश दिले.
त्याप्रमाणे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आदेश निर्गमित करत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण 192 जातीवाचक वस्त्यांची व 25 जातीवाचक रस्त्यांची नावे बदलण्याबाबतचा अहवाल तयार केला. तर तो आता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झाला आहे.
दरम्यान जिल्ह्यातील या 192 जातीवाचक वस्त्यांची व 25 जातीवाचक रस्त्यांची नावे बदलण्याकरता ग्रामसभेचा ठराव पास झाले आहेत. त्याबाबतचे प्रस्तावही गटविकास अधिकारी यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाले होते. आता हे सर्व प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले असून जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्यात येणार आहेत.
प्र.१: सिंधुदुर्गमध्ये किती वस्त्या आणि रस्त्यांची नावे बदलली जाणार आहेत?
👉 एकूण 192 वस्त्या आणि 25 रस्त्यांची नावे बदलली जाणार आहेत.
प्र.२: हा आदेश कोणी दिला आहे?
👉 महाराष्ट्राचे पालकमंत्री नितेश राणे यांनी हा आदेश दिला आहे.
प्र.३: नावबदल करण्यामागचा उद्देश काय आहे?
👉 जातिवाचक ओळखी नष्ट करून सामाजिक सौहार्द आणि समानता प्रस्थापित करणे हा मुख्य उद्देश आहे.
प्र.४: ही प्रक्रिया कोण पाहणार आहे?
👉 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.
प्र.५: या निर्णयाचा समाजावर काय परिणाम होईल?
👉 समाजात एकता वाढेल आणि भेदभावमुक्त ओळखीचा संदेश दिला जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.